टाटा मोटर्सने या नेक्सन एसयूव्हीचे चार नवीन व्हेरियंट लाँच केले आहेत. ही देशातील सर्वात सुरक्षित एसयूव्ही असून आतापर्यंत ३ लाख युनिट्सची विक्री झाली आहे. आता कंपनीने ही गाडी अद्ययावत वैशिष्ट्यांसह आणि नवीन रंगसंगतीसह बाजारात लाँच केली आहे. पहिला प्रकार XZ + (P), दुसरा प्रकार XZA + (P), तिसरा प्रकार XZ + (HS) आणि चौथा प्रकार XZA + (HS) आहे. कंपनीने केवळ डार्क एडिशनमध्येच हे व्हेरियंट लाँच केले आहेत. लवकरच नवीन रॉयल ब्लू कलरमध्येही लाँच केले जातील. चार प्रकार हे टॉप एंड वेरियंट असून यात पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय दिले गेले आहेत.
पेट्रोल इंजिन व्हेरियंट १०.८७ लाखांपासून सुरु होते आणि टॉप व्हेरियंटवर ११.५९ लाखांवर जाते. या गाड्या एअर प्युरिफायर, ऑटो डिमिंग IRPM, हवेशीर फ्रंट सीट यासारख्या वैशिष्ट्यांसह अपडेट केल्या आहेत. टाटा नेक्सनच्या ट्रिम्सचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. जे ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वाइप्स, इलेक्ट्रिक सनरूफ, क्रूझ कंट्रोल, IRA कनेक्टेड कार तंत्रज्ञान इत्यादी वैशिष्ट्ये देतात. सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, समोरच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, EBD आणि EBS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत, याशिवाय ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत.
MG Motors ने फेब्रुवारी महिन्यात देशात ४५०० युनिट्सची केली विक्री, आता लक्ष अपडेटेड ZS EV कडे
नेक्सन XZ+ (P) या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ११,५८,९०० रुपये (एक्स-शोरूम) आहे. XZA + (P) व्हेरियंटची सुरुवातीची किंमत रु. १२,२३९०० (एक्स-शोरूम), नेक्सन XZ + (HS) व्हेरियंटची सुरुवातीची किंमत रु. १९,८६,८०० (एक्स-शोरूम) आणि XZA + (HS) रु. ११,५१,८०० एक्स-शोरूम आहे.