भारतातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्सने पहिल्या एएमटी सीएनजी कार्स लाँच केल्या आहेत. नवीन ईव्ही लाँच करून टाटा मोटर्स कंपनी इलेक्ट्रिक वाहन लाइनअप वाढविण्याबरोबर सीएनजी सेगमेंटवरही लक्ष केंद्रित करीत आहेत. अनेक वाहने लाँच केल्यानंतर आता कंपनीने एएमटी ट्रान्स्मिशनसह टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी एएमटी कार लाँच केल्या आहेत. तर, टाटाच्या या दोन नवीन ऑटोमॅटिक सीएनजी एएमटी वाहनांबद्दल (Tata Tiago and Tigor CNG AMT) आपण या बातमीतून अधिक जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी एएमटी- डिजाइन आणि प्लॅटफॉर्म

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी कार मॅन्युअल गिअरबॉक्स व्हर्जन आहेत. अलीकडे कंपनीने लाँच केलेले हॅचबॅक आणि सेडान या गाड्यांचे एमटी व्हर्जन आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्या मॅन्युअल व्हर्जनप्रमाणेच प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. या दोन्ही कार मॅन्युअल गिअर बॉक्स व्हर्जनप्रमाणेच डिझाइन केलेल्या आहेत. पण, यातील एक खास गोष्ट म्हणजे टियागोला नवीन टोर्नेडो ब्ल्यू शेड; तर टिगोरला मेट्योर ब्रॅण्झ रंग देण्यात आला आहे.

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी एएमटी – व्हेरिएंट्स

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी एएमटी चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहेत; ज्यामध्ये टीयागो एनआरजी आणि एक्सटीए, एक्सझेडए प्लस, एक्सझेडए प्लस ड्युअल-टोन व एक्सझेडए एनआरजी यांचा समावेश आहे. तर, टिगोर सीएनजी एएमटी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे; ज्यामध्ये एक्सझेडए आणि एक्सझेडए प्लस यांचा समावेश आहे.

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी एएमटी : किंमत

टाटा टियागो एक्सटीए (XTA) ची किंमत ७.९० लाख रुपये; तर टिगोर एक्सझेडए व्हेरिएंट (XZA) ची किंमत ८.८५ लाख रुपये आहे.

टाटा टियागो एक्सझेडए प्लस (XZA +) ८.८० लाख रुपयांत; तर एक्सझेडए प्लस टिगोर व्हेरिएंट (XZA +) ९.५५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

टाटा टियागो एक्सझेडए प्लस ड्युअल टोन (XZA+ dual-tone)ची किंमत ८.९० लाख रुपये आहे.

टाटा टियागो एक्सझेडए एनआरजी (XZA NRG) ची किंमत ८.८० लाख रुपये आहे.

हेही वाचा…मारुतीने खेळला नवा गेम; १० महिन्यात १ लाख युनिट्सची विक्री झालेल्या कारचा आणला नवा एडिशन अन् बरेच फायदे

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी एएमटी – इंजिन स्पेसिफिकेशन

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी ही वाहने एएमटी १.२ लिटर इंजिनद्वारे समर्थित आहेत; ज्या पेट्रोलवर चालताना ८५बीएचपी आणि ११३ एनएम टॉर्क निर्माण करतात. सीएनजी मॉडेलमध्ये या दोन्ही गाड्या कमी पॉवर विकसित करतात. पण, सर्वांत खास गोष्ट म्हणजे नवीन टियागो आणि टिगोर एएमटी ट्रान्स्मिशनसह उपलब्ध आहेत.टाटा मोटर्सचा दावा आहे की, या सीएनजी कार २८.०६ किमी/किलोपर्यंत मायलेज देत आहेत.

सीएनजी स्पेसिफिकेशन

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी कारमध्ये डिस्प्लेसमेंट १.२ लिटर, पॉवर – ७२ बीएचपी, टॉर्क ९५एनएम व गिअर बॉक्स एएमटी असणार आहे. तर, तुम्हीसुद्धा टाटाच्या टियागो आणि टिगोर या सीएनजी कार खरेदी करू शकणार आहात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors launched 1st amt cng tiago and tigor cars in india all you need to know about price and variants asp