Tata Motors ही भारतामधील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स बाजारामध्ये लॉन्च करत असते. तसेच यावेळी ती आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेची खास काळजी घेत असते. टाटा मोटर्स आपल्या SUV सेगमेंटची सध्याची रेंजमध्ये बदल करण्यासाठी तत काही अपडेट्स घेऊन येत आहे. ज्या अंतर्गत कंपनी लवकरच आपल्या Tata Harrier आणि Tata Safari ची अपडेटेड आवृत्ती लॉन्च करणार आहे. सफारी आणि हॅरिअरचा नवीन अवतार ऑक्टोबर २०२३ पर्यंत बाजारात लॉन्च केला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा मोटर्सकडून सफारी आणि हॅरिअरचे नवीन अपडेटेड सिरीज लॉन्च केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये फ्रंट आणि रिअर बंपर आणि फ्रंट ग्रील नवीन डिझाईनमध्ये दिसणार आहेत. यासह इंटेरिअरमध्ये काही फीचर्स अपडेट करण्यासोबतच कंपनी या दोन्ही एसयूव्हीसह एक नवीन पॉवरट्रेन देखील सादर करू शकते. दिवाळीच्या दरम्यान कंपनी या दोन्ही अपडेटेड सिरीजशी किंमत जाहीर करू शकते.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 7 April: ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Tata Motors या SUV मध्ये जी पॉवरट्रेन देऊ शकते त्यामध्ये १.५ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन असू शक्ति. ज्याचे टेस्टिंग देखील सुरु झाले आहे. अलीकडेच सफारी फेसलिफ्ट टेस्टिंग दरम्यान पुण्याच्या बाहेरील भागात स्पॉट करण्यात आली होती. जी जवळून तपासणी केल्यावर असे दिसून आले की ते हॅरिअर ईव्ही संकल्पनेसह काही सामान्य डिझाइनचे संकेत होते ज्याचे ऑटो एक्सपो २०२३ मध्ये पूर्वावलोकन करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त AutoCar India ने दिले आहे.

टाटा हॅरिअर (Image Credit – tatamotors.com)

टाटा हॅरिअर आणि सफारी या दोन्ही फेसलिफ्टला परिचित स्प्लिट हेडलॅम्प डिझाइनसह पूर्णपणे नवीन फ्रंट फॅशिया मिळेल. पुन्हा तयार केलेल्या ग्रीलला उभ्या स्लॅटमुळे फ्रेश डिझाइन देखील पाहायला मिळते. ग्रीलच्या वर एक पूर्ण एलईडी लाईटचा बार असण्याची शक्यता आहे. जे हेडलॅम्प्स एकमेकांना जोडते. हे फीचर आगामी Nexon फेसलिफ्ट मध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. जी ऑगस्ट २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. दोन्ही SUV ला एलईडी लाइट बार, नवीन टेल लॅम्प , थोडेसे बदल असलेले टेलगेट डिझाईन आणि नवीन लूक असलेले अलॉय व्हील्ससह अनेक डिझाईन यामध्ये मिळणार आहे.

टाटा सफारी (Image Credit – tatamotors.com)

RDE नॉर्म्स आणि BS6 सेकंड स्टेज अपग्रेडसह, हॅरिअर आणि सफारी दोन्ही SUV ला अलीकडेच नवीन 10.25-इंच स्क्रीन आणि हाय-स्पेक ट्रिम्समध्ये ADAS सारखी आणखी काही फीचर्स मिळाली आहेत. रिपोर्ट्सनुसार, पुढील अपडेटमध्ये हॅरिअर आणि सफारी फेसलिफ्टच्या डॅशबोर्डच्या डिझाइनमध्ये बदल आणि इंटेरिअरसाठी नवीन टेक्सचर आणि शेड्स आणण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : Hyundai New SUV: टाटा-मारुतीचं वाढलं टेन्शन, Hyundai देशात आणतेय सर्वात स्वस्त SUV

रिपोर्ट्सनुसार, सफारी आणि हॅरिअरचे अपडेटेड मॉडेल ऑक्टोबर २०२३ पर्यंत बाजारात लॉन्च केले जाईल. टाटा मोटर्स सप्टेंबर २०२३ पासून हॅरिअर आणि सफारी फेसलिफ्टचे उत्पादन पिंपरीच्या प्लांटमधील ओमेगा कारखान्यात सुरू करेल आणि दिवाळीच्या अगदी आधी ऑक्टोबर २०२३ पर्यंत बाजारात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. लॉन्च केल्यावर हे अपडेटेड मॉडेल्स 7-सीटर महिंद्रा XUV7O0, Hyundai Alcazar आणि नवीन MG Hector Plus या गाड्यांशी स्पर्धा करेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors launched harrier and safari updates models major changes october 2023 tmb 01
Show comments