डिझेल-पेट्रोलच्या चढत्या किमती पाहता भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी प्रचंड वाढली आहे. आता टाटाने आपल्या इलेक्ट्रिक नेक्सॉन या एसयूव्हीचं फेसलिफ्ट मॉडेल सादर केलं आहे. यामध्ये कित्येक हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन Nexon EV फेसलिफ्टला मोठ्या अपडेटसह सादर करण्यात आले आहे. ही आतापर्यंतची सर्वात प्रगत Nexon EV आहे.
2023 नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये काय आहे खास?
Nexon.ev च्या मध्यम श्रेणी (MR) डेरिव्हेटिव्हला ३० kWh बॅटरी पॅक मिळतो, तसेच १२७ bhp आणि २१५ Nm जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर मिळते. हा सेटअप एका पूर्ण चार्जवर ३२५ किमीची रेंज देऊ शकतो. त्याच वेळी, Nexon.ev च्या लाँग रेंज (LR) डेरिव्हेटिव्हला ४०.५kWh चा बॅटरी पॅक मिळतो, जो १४३ bhp आणि २१५ Nm जनरेट करणार्या इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देतो. हे एका चार्जवर ४६५ किमीची रेंज देऊ शकते.
2023 नेक्सॉन फेसलिफ्ट वैशिष्ट्ये
यात अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्स आहेत, ज्यात V2V (व्हेईकल टू व्हेईकल चार्जिंग) आणि V2L (व्हेइकल टू लोड) फीचर्स आहेत. कारमध्ये ३१.२४ सेमी (१२.३ इंच) अल्ट्रा-हाय डेफिनिशन (एचडी) टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आहे, जे सेगमेंटमधील सर्वात मोठे आहे. यासह, केबिनमध्ये हरमनच्या ऑडिओवॉर्क्स आणि ९ उच्च दर्जाचे जेबीएल स्पीकरसह उत्कृष्ट ऑडिओ अनुभव मिळणार आहे. यात एक मोठा २६.०३ सेमी (१०.२५ इंच) हाय डेफिनिशन पूर्णपणे पुनर्रचना करता येण्याजोगा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जो मल्टी डायल व्ह्यू देतो.
(हे ही वाचा : १ ऑक्टोबरपासून भारतात कार्समध्ये ६ एअरबॅग्स मिळणार का? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं… )
सुरक्षा वैशिष्ट्ये
टाटाने नवीन Nexon EV सह सुरक्षिततेचीही विशेष काळजी घेतली आहे. सर्व नवीन Nexon.ev मध्ये ६ एअरबॅग मानक म्हणून प्रदान केल्या आहेत. यामध्ये i-VBAC सह ESP, संपूर्ण श्रेणीमध्ये मानक बनवण्यात आले आहे. ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील प्रदान केला आहे. पार्किंग सुलभ करण्यासाठी, कारमध्ये ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटरसह ३६०o सराउंड व्ह्यू कॅमेरा सिस्टम आहे.
2023 नेक्सॉन फेसलिफ्ट किंमत
Tata Motors ने नवीन Nexon EV च्या किमती जाहीर केल्या आहेत. नवीन 2023 Nexon.ev च्या किमती १४.७४ लाख रुपयांपासून सुरू होतात आणि १९.९४ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जातात.