भारतीय वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सचा भारतीय बाजारात मोठा दबदबा पाहायला मिळतो. टाटाच्या अनेक कार बाजारपेठेत उपलब्ध आहेत आणि या कारची मोठी मागणी आहे. टाटा मोटर्सने पुन्हा एकदा मोठी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. लवकरच टाटा मोटर्स बाजारपेठेत आपली नवीन कार बाजारात सादर करणार असल्याची माहिती आहे.
२०२४ च्या सुरुवातीला बहुप्रतिक्षित Tata Curvv SUV Coupe सादर करण्याची कंपनीची योजना आहे. सुरुवातीला हे मॉडेल इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह लाँच केले जाईल, त्यानंतर अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) आवृत्ती देखील लाँच केली जाईल. याशिवाय Tata Sierra SUV देखील २०२५ मध्ये लाँच केली जाऊ शकते. Curve प्रमाणे, Sierra EV प्रथम बाजारात लाँच होईल, नंतर त्याची ICE आवृत्ती येईल.
(हे ही वाचा : ग्राहकांना धक्का! ‘या’ प्रसिध्द कंपनीच्या पेट्रोल-डिझेल कारची विक्री बंद, फक्त इलेक्ट्रिक गाड्या धावणार रस्त्यावर )
टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी देखील उघड केले आहे की, कंपनी सध्या त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट नसलेल्या विभागात प्रवेश करण्याचा विचार करीत आहे. मात्र, या आगामी मॉडेलबाबत त्यांनी फारशी माहिती दिली नाही. पण, हे एमपीव्ही मॉडेल असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. कॉम्पॅक्ट एमपीव्ही सेगमेंटमध्ये सध्या मारुती सुझुकी एर्टिगा, टोयोटा रुमिओन, किया केरेन्स आणि महिंद्रा मराझो सारखे पर्याय आहेत. याव्यतिरिक्त, सेगमेंटमध्ये मारुती इन्व्हिक्टो, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉस सारखे मॉडेल देखील आहेत. पण, टाटाकडे या सेगमेंटमध्ये कोणतेही मॉडेल नाही.
टाटाची आगामी एमपीव्ही या विद्यमान मॉडेल्सपेक्षा कशी वेगळी असेल हे पाहणे आता बाकी आहे. तथापि, अशी अपेक्षा केली जाऊ शकते की, कंपनी आपल्या नवीन एमपीव्हीमध्ये आधुनिक वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान देईल. जर टाटाची आगामी MPV खरोखरच विकसित होत असेल, तर ती एर्टिगा आणि इनोव्हा सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.