टाटा मोटर्सच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक असलेल्या Tata Nexon ने ५ लाख कारच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. २०१७ मध्ये लॉन्च झाल्यापासून ५ लाख कार विक्री गाठण्यासाठी सहा वर्षांपेक्षा कमी कालावधी लागला आहे. नेक्सॉनने सप्टेंबर २०२२ मध्ये ४ लाख कार मैलाचा दगड ओलांडून ७ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत शेवटच्या १ लाख कार प्लांटमधून बाहेर पडल्या. अधिक प्रभावीपणे, लोकप्रिय सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीचे शेवटचे ३ लाख युनिट २४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बनवले गेले आहेत.

SUV सेगमेंटमध्ये ५ स्टार रेटिंग असणारी SUV निवडक संख्येमध्येच उपलब्ध आहेत. ज्यामध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्रा कंपनीची एसयूव्ही सर्वात जास्त उपलब्ध आहेत. . टाटा नेक्सॉन या सर्वोत्कृष्ट सुरक्षा रेटिंग SUV च्या श्रेणीमध्ये येते. आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्ये, सुरक्षितता, मायलेज आणि कमी बजेटमध्ये सनरूफ सारख्या प्रीमियम फीचर्ससह येते.

government indicate extension of credit scheme for micro and small enterprises
सूक्ष्म, लघू उद्योगांच्या पतहमी योजनेला मुदतवाढीचे संकेत;  अतिरिक्त ५ लाख कोटींच्या तरतुदीचा केंद्राचा विचार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
import duty cut will boost gold jewellery retailers revenues surge by 22 to 25 pc this fiscal crisil report
आयात शुल्क कपातीमुळे सराफांना सुवर्णसंधी; महसुलात २५ टक्क्यांपर्यंत वाढीचा ‘क्रिसिल’चा अंदाज
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
Top 5 vehicles in Google trends know their prices and features
Top 5 vehicles in Google trends: गूगलवर चर्चेत असलेले पाच सर्वोत्तम कार आणि बाइक, जाणून घ्या त्यांची किंमत्त अन् फिचर्स
Maruti Jimny Car Sales Maruti Jimny Got Record Growth Of 5700 Percent In Exports Check Details
Maruti Jimny Car Sales: या कारने विक्रीच्या बाबतीत मोडला रिकॉर्ड; जाणून घ्या किती झाली विक्री
Noida Traffic Police News
Noida Police News : हेल्मेट न घालता कार चालवल्याने पोलिसांनी चालकाला आकारला एक हजारांचा दंड; कुठे घडला प्रकार?
Mumbai, Capital Markets, Stock Indices, Sensex, Nifty, Federal Reserve, Jerome Powell, Jackson Hole Meeting, Domestic Institutional Investors, Foreign Institutional Investors,
तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ

हेही वाचा : Tata Motor Price Hike: ग्राहकांसाठी मोठी बातमी! टाटा मोटर्स आपल्या कारच्या किंमतीत ‘या’ तारखेपासून करणार वाढ

तुम्ही मिड-रेंज S SUV देखील शोधत असाल, तर पर्याय म्हणून, Tata Nexon च्या बेस मॉडेलची किंमत, फीचर्स, इंजिन आणि फायनान्स प्लॅन जाणून घ्या.

Tata Nexon Price

Tata Nexon Everai च्या बेस मॉडेलची सुरुवतीची किंमत ७,७९,९०० रूपये आहे. तसेच या गाडीची किंमत ऑन रोड किंमत ही ८,७५,३६७ रुपये इतकी आहे.

Tata Nexon – (image Credit-Financial Express)

Tata Nexon चा फायनान्स प्लॅन

Tata Nexon गाडी खरेदी करण्यासाठी जर का तुमच्याकडे ८ लाख रुपयांचे बजेट नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे या गाडीला ९९ हजार रुपयांमध्ये आपल्या घरी घेऊन जाऊ शकता.

ऑनलाईन पेमेंट आणि EMI चा विचार केल्यास जर तुमच्याकडे ९९ हजार रुपये आहेत. तसेच या गाडीचा मासिक हप्ता तुम्ही भरू शकत असाल तर तुम्ही या गाडीची खरेदी करण्यासाठी बँक तुम्हाला ७,७६,३६७ रुपयांचे कर्ज देऊ शकते. Tata Nexon च्या बेस मॉडेलबद्दल आपण इथे बोलत आहेत. कर्ज मंजूर झाल्यानंतर ९९ हजार रुपये या एसयूव्हीला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट भरावे लागणार आहे. तसेच बँकेने मंजूर केलेलं कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षांच्या काळामध्ये तुम्हाला १६, ४१९ रुपये इतका हप्ता प्रत्येक महिन्याला भरावा लागणार आहे.

हेही वाचा : Aston Martin ने लॉन्च केले आतापर्यंतचे ‘हे’ सर्वात शक्तिशाली मॉडेल; ‘इतक्या’ युनिट्सचीच होणार विक्री

इंजिन आणि मायलेज

टाटा मोटर्सने या एसयूव्हीमध्ये ११९९ सीसीचे इंजिन दिले आहे. जे ११८.३५ बीएचपी आणि १७० एमएमचे पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आलेला आहे. tata nexon कार ही एक लिटर पेट्रोलमध्ये १७ ते १८ किमीच्या दरम्यान मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. या मायलेजला ARAI द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे.

महत्वाची टीप : वर दिलेल्या माहितीच्या आधारे गाडी खरेदी करत असताना पूर्ण चौकशी करूनच कोणताही आर्थिक व्यवहार करावा.