Tata Cars Discounts in July 2024: देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित कुपे-स्टाईल इलेक्ट्रिक एसयुव्ही Tata Curvv EV नुकतीच लाँच केली. ज्याची एक्स शोरूम किंमत १७.४९ लाख रुपये आहे. टॉप मॉडेलसाठी ही किंमत २१.९९ लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने नवीन ईव्ही जबरदस्त स्टाईल आणि डिझाइनसह सादर केली.  ही कार १५० किमीची रेंज देते. याच्या बॅटरीला ७०kW च्या चार्जरने फक्त ४० मिनिटात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केलं जाऊ शकतं. एकाच चार्जवर ही कार ५८५ किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही कार लाँच करताच टाटाने बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय कारवर सूट जाहीर केलं आहे. आता तुम्हाला टाटाच्या कार स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

टाटाने आपल्या सध्याच्या Nexon EV वर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. याचा अर्थ, जर तुम्हाला Curvv EV आवडत नसेल, तर तुम्ही सध्याची Nexon इलेक्ट्रिक SUV खरेदी करून पैशांची बचत करू शकता. मात्र ही ऑफर ३१ ऑगस्टपर्यंतच लागू असेल, असे कंपनीने नमूद केले आहे.

Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Mandhardev , Kalubai yatra, devotees ,
मांढरदेव यात्रेला सुरुवात, ‘काळूबाई’च्या जयघोषात हजारो भाविक दाखल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?

Nexon EV वर किती रुपयांची सूट?

Tata Nexon EV च्या बेस मॉडेलवर १०,००० रुपयांची सूट दिली जात आहे तर त्याच्या टॉप मॉडेलवर १.८० लाख रुपयांची सूट दिली जात आहे. Nexon EV पूर्ण चार्ज केल्यावर ३२५ किलोमीटर ते ४६५ किलोमीटरची रेंज ऑफर करते. Nexon EV ची किंमत रु. १७.४९ लाख ते रु. १७.९९ लाखांपर्यंत आहे, परंतु ही किंमत त्याच्या मोठ्या बॅटरी पॅकसाठी आहे.

नेक्सॉन पेट्रोलवर किती रुपयांची सूट?

यापूर्वी, टाटा मोटर्सने त्यांच्या नेक्सॉन रेंजवर १ लाख रुपयांपर्यंत सूट दिली होती, जी अजूनही सुरू आहे. Nexon ची एक्स-शोरूम किंमत ८ लाख ते १५.८० लाख रुपये आहे. याबद्दल बोलायचे झाल्यास, यात १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे १२० एचपी पॉवर देते तर १.५ लीटर डिझेल इंजिन ११५ एचपी पॉवर देते. Nexon थेट Kia Sonet, Hyundai Venue आणि Maruti Brezza शी स्पर्धा करते.

टियागोसह सफारीवर सवलत

ऑगस्ट महिन्यात तुम्हाला टाटाच्या छोट्या कारवर टियागो ते सफारीपर्यंत चांगली सूट मिळेल. या महिन्यात, Tiago वर ६०,००० रुपयांची सूट दिली जात आहे, तर तुम्ही सेडान कार Tigor वर ५५,००० रुपये वाचवू शकता. या दोन्ही कारमध्ये १.२L पेट्रोल इंजिन आहे.

सफारीवर कंपनी १.६५ लाख रुपयांची सूट देत आहे. सफारीची किंमत १६.१९ लाख ते २७.३४ लाख रुपयांपर्यंत आहे. या SUV मध्ये २.० लीटर, ४ सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन आहे जे १७० hp पॉवर आणि ३५० Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची सुविधा आहे. सफारी अनेक प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. पंचवर १८,००० रुपयांची सूट दिली जात आहे. या सवलतींबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही टाटा डीलरशीपशी संपर्क साधू शकता.

Story img Loader