टाटा मोटर्सने शुक्रवारी नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर केली. ही पुढच्या पिढीची इव्ही कार असणार आहे. टाटा मोटर्सने या नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कारचे नाव संस्कृत भाषेतील अविन्य या शब्दावरून घेतले आहे. त्याचा अर्थ ‘आविष्कार’ असा आहे.या एसयूव्हीला आधुनिक नवीन डिझाईन देण्यात आले आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. टाटा मोटर्सने २०२५ पर्यंत नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट एसयूव्ही बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून सर्व वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या गाडीच्या सर्व लाईट्स या एलईडी असणार आहेत. विशेष म्हणजे कारच्या स्टिअरिंगमध्येही डिस्प्ले असेल. या कारमध्ये बटरफ्लाय डोअर्स देण्यात आले आहेत म्हणजे समोरचे दरवाजे समोरच्या बाजूने उघडतील तर मागील दरवाजे मागील बाजूस उघडतील ज्यामुळे या कारला प्रीमियम लुक मिळेल.
टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, “अविन्याला संकल्पनेतून वास्तवाकडे वळवताना आमचे लक्ष केवळ मोबिलिटीसाठी असे वाहन तयार करण्यावर होते, जे आजपर्यंत कधीही तयार झाले नाही. वाहनांसाठी डिझाइन केलेले सर्वोच्च दर्जाचे सॉफ्टवेअर असून पृथ्वीवरील कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात मदत करेल.”
EV चार्जिंग सुविधा देण्यासाठी एमजी मोटर इंडियाचा पुढाकार, BPCL कंपनीसोबत केली भागीदारी
कंपनीकडून सांगण्यात आले की, अवन्याला Gen 3 आर्किटेक्चरवर विकसित करण्यात आले आहे. जे इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्यासाठी टाटाने तयार केलेले एक नवीन व्यासपीठ आहे. आगामी काळात कंपनीची सर्व इलेक्ट्रिक वाहने या प्लॅटफॉर्मवर बनवली जातील. त्याच वेळी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी सांगितले की, वाहनात अल्ट्रा फास्ट चार्जिंग बॅटरी वापरली जाईल, ज्यामुळे संपूर्ण बॅटरी ३० मिनिटांत चार्ज होईल.