Tata Motors ही देशातील एक लोकप्रिय आणि आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या गिऱ्हाकांसाठी कंपनी नवनवीन कार्सच्या मॉडेल्सची निर्मिती करत असते. सध्या टाटाच्या कार्सच्या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एसयूव्ही कार्स आणि EV कार्स या गाड्यांची मागणी खूप वाढली आहे. तसेच टाटाच्या CNG प्रकारातील गाडयांच्या मागणीत देखील वाढ झालेली दिसून येत आहे.

सीएनजी मॉडेल्सची वाढती मागणी बघून कंपनीने सीएनजी मॉडेल्स देखील मोठ्या प्रमाणात लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने ज्या गाडीचे नाव समोर येते ते म्हणजे Tata Altroz iCNG या गाडीचे. या मॉडेलच लॉन्चिंग होण्यापूर्वीच कंपनीने याचे बुकिंग सुरु केले आहे. आज आपण या गाडीच्या बुकिंगबद्दल , फीचर्स आणि किंमतीबाबदल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

हेही वाचा : नवीन कारसोबत स्टेपनी टायर मिळणार नाही? वेगळा घ्यावा लागणार का? कार कंपन्या घेणार मोठा निर्णय

Tata Altroz iCNG हे मॉडेल कंपनीने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर केले होते. ही भारतातील पहिली सीएनजी कार आहे ज्यामध्ये कंपनी ट्वीन सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी देणार आहे. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर केल्यावर या गाडीला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला. त्याचे मुख्य कारण आहे यामध्ये ट्वीन सीएनजी सिलेंडर असूनदेखील मोठी बूटस्पेस मिळते. जी सध्या कोणत्याही सीएनजी गाडीमध्ये मिळत नाही.

टाटा अल्ट्रोझ आयसीएनजी (Image Credit-Financial Express)

Tata Altroz iCNG मिळणार काही खास सुविधा

Twin Cylinder Technology: नवीन ट्वीन सिलेंडर टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये एकूण ६० लिटर पाण्याची क्षमता आहे. प्रत्येक सिलेंडर हा ३० लिटर क्षमतेचा आहे. तसेच ग्राहकांना त्याचे सामना ठेवण्यासाठी जास्तीत जास्त जागा BootSpace मिळावी म्हणून हे सामान ठेवण्याच्या जागेच्या मागील बाजूस ठेवण्यात आले आहे.

सिंगल अॅडव्हान्स्ड ECU हे , आरामदायी आणि धक्क्यांशिवाय प्रवासाचा अनुभव देते. हे पेट्रोलवरून सीएनजी व्हर्जनमध्ये आणि सीएनजीमधून पेट्रोल व्हर्जनमध्ये सहज शिफ्ट करता येते. अल्ट्रोझ आयसीएनजी कोणत्याही त्रासाशिवाय थेट सीएनजी मोडमध्ये सुरू करता येते. ते फ्युएल मोडमध्ये शिफ्ट करताना चालकाला कोणतेही कालजी करण्याची गरज पडणार नहीं. ग्राहकांना मनःशांती प्रदान करण्यासाठी, कंपनी टाटा अल्ट्रोझ आय सीएनजीसह ३ वर्षे किंवा १,००,००० किमी पर्यंतची मानक वॉरंटी देत ​​आहे.

टाटा अल्ट्रोझ आयसीएनजी (Image Credit-Financial Express)

हेही वाचा : मारुती करणार मोठा धमाका! बाजारात आणतेय ‘या’ दोन नव्या Hybrid कार, 40kmpl चं मायलेज अन् किंमत फक्त…

Tata Altroz iCNG चे Booking

जे ग्राहक Tata Altroz iCNG या गाडीची खरेदी करू इच्छित आहेत ते टाटा मोटर्सच्या वेबसाईटवर जाऊन याचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. तसेच आपल्या जवळच्या टाटा मोटर्सच्या डिलरकडे जाऊन ऑफलाईन प्रकारे सुद्धा बुकिंग करू शकता. या गाडीचे बुकिंग तुम्ही केवळ २१,००० रुपयांची टोकं माउंट देऊन करू शकणार आहात.

Story img Loader