Tata Altroz iCNG Launch: टाटा मोटर्सने ऑटो एक्सपो २०२३ मध्ये त्यांच्या अल्ट्रा आणि पंच सीएनजी कार सादर केल्या. तेव्हापासून बाजारात या गाड्यांची प्रतीक्षा आहे. ग्राहकांची प्रतीक्षा संपवत आता कंपनी Tata Altroz iCNG बाजारात आणणार आहे. कंपनीने स्वत: लाँचची तारीख जाहीर केली आहे. एका टीझरद्वारे टाटा मोटर्सने सांगितले की, Altroz CNG भारतात १९ एप्रिल रोजी लाँच होणार आहे. जाणून घेऊयात काय खास असेल.
इंजिन पॉवर
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला Tata Ultroz CNG व्हर्जनमध्ये फक्त १.२ लीटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. हे इंजिन ८४ bhp आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करते. CNG मोडमध्ये, हे इंजिन किंचित कमी पॉवर जनरेट करेल आणि त्याचे पॉवर आकडे ७६ Bhp आणि ९७ पीक टॉर्क असणार आहेत. विशेष बाब म्हणजे, या कारमध्ये कंपनीने ट्विन सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत कंपनीने ६० लीटर सीएनजी सिलेंडरचे दोन भाग केले आहेत. यामुळे हा सिलेंडर जास्त जागा घेणार नाही आणि तुम्हाला बूट स्पेसही भरपूर मिळेल.
(हे ही वाचा : रतन टाटा यांची फेव्हरेट अन् देशातील पहिली डिझेल कार नव्या अवतारात होणार दाखल? पण… )
लुक आणि डिजाइन
डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते Altroz च्या पेट्रोल व्हर्जन सारखे दिसेल. २०२३ ऑटो एक्स्पोमध्ये, ज्या मॉडेलचे प्रदर्शन करण्यात आले होते, त्यामध्ये समोरच्या आणि मागील विंडशील्डवर CNG स्टिकर्स वगळता कोणतेही वेगळे घटक नव्हते. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Altroz CNG पूर्णपणे लोड केलेल्या ट्रिममध्ये ऑफर करणे अपेक्षित आहे. यात ६ एअरबॅग्ज, व्हॉइस-अॅक्टिव्हेटेड इलेक्ट्रिक सनरूफ, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि १६-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील मिळतील. याशिवाय, यात ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, स्वयंचलित हवामान नियंत्रण, मागील एसी व्हेंट्स, उंची-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि ऑटो-फोल्डिंग ORVM देखील मिळतील.
मोठा बूट स्पेस
सीएनजी टँकला खाली आणि फ्लॅट सारखे ठेवले आहे. यावरून बूट स्पेसचे जास्तीत जास्त वापर केला जावू शकतो. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सीएनजी टँक मोठ्या खूबीने ठेवले आहेत. यामुळे कार्गो क्षमतेसाठी बूट स्पेसशी कोणतीही तडजोड करायची गरज पडत नाही.
किंमत
टाटा अल्ट्रोझ सीएनजी प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी बलेनो आणि टोयोटा ग्लान्झा यांना टक्कर देते. किमतींबद्दल बोलायचे झाले तर, अल्ट्रोझ सीएनजीची किंमत मानक आवृत्तीपेक्षा ६० ते ८० हजार रुपये जास्त असेल.