Tata Motor’s Upcoming 4 SUVs: टाटा मोटर्स हे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने मागील काही वर्षांमध्ये देशातील ऑटोमोबाईल विभागांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बाजारामध्ये सुरु असलेल्या स्पर्धेचा विचार करुन टाटा मोटर्स आपल्या उत्पादनांमध्ये सतत अपडेट्स करत असल्याचे पाहायला मिळते. जुन्या वाहनांमध्ये अपडेट करण्याबरोबर ही कंपनी नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची निर्मिती करत असते. Drives park या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२३ पर्यंत भारतामध्ये ४ एसयूव्ही कार्स लॉन्च केल्या जाणार आहेत.
Tata Nexon Facelift
Tata Nexon SUV च्या आगामी फेसलिफ्ट व्हर्जनची चाचणी सुरु असताना ही कार अनेकांच्या दृष्टीस पडली आहे. नवनवीन फीचर्ससह हे मॉडेल ADAS टेक आणि अपडेटेड पॉवरट्रेन ऑप्शननी सुसज्ज असू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कार भारतातील बहुप्रतिक्षित एसयूव्हींपैकी एक आहे असे म्हटले जात आहे. Tata Nexon Facelift कार या वर्षाच्या शेवटी लॉन्च केले जाऊ शकते.
Tata Harrier Facelift
टाटा मोटर्सच्या Tata Harrier Facelift या एसयूव्ही कारची टेस्टिंग सुरु आहे. ही चारचाकी गाडी ऑक्टोबर २०२३ पर्यंत भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकते असे लोक म्हणत आहेत. Level 2 ADAS सह अन्य हायटेक फीचर्स असू शकतात. या एसयूव्ही कारमध्ये डिजिटल इन्स्टुमेंट क्लस्टर आणि मोठ्या इन्फोटेनमेंट युनिट जोडण्यात येणार आहे असे म्हटले जात आहे.
Tata Safari Facelift
Tata Harrier Facelift सह Tata Safari Facelift ही कार सुद्धा ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ७ सीटर एसयूव्हीच्या फ्रंट आणि बॅक साइड इंटिरिअरमध्ये अपडेट्स करण्यात आले आहेत. त्याशिवाय कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटचा समावेश असणार आहे. यात Level 2 ADAS आणि शक्तिशाली डिझेल इंजिन आहे.
Tata Punch EV
Tata Punch SUV हे टाटा मोटर्सच्या सर्वात यशस्वी उत्पादनांपैकी एक आहे. आता या मॉडेलचे रुपांतर कंपनी EV मध्ये करणार आहे. Tata Punch EV डिसेंबर महिन्यामध्ये लॉन्च होऊ शकते अशी ग्राहकांना आशा आहे. या इलेक्ट्रिक कारमुळे Citroen eC3 इलेक्ट्रिक हॅचबॅकसमोर आव्हान निर्माण होणार आहे. Tata Punch EV ची रेंज ही सुमारे ३०० किमी असू शकते असे म्हटले जात आहे.