टाटा मोटर्स हे वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक अग्रगण्य कंपनी आहे. सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स असणारी ही कंपनी आहे. आता टाटा मोटर्स लवकरच आपला पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी आपल्या लोकप्रिय SUVs Tata Safari(एसयूव्ही टाटा सफारी), Tata Harrier(टाटा हॅरिअर) आणि Tata Altroz(टाटा अल्ट्रोझ) ​​चे इलेक्ट्रिक मॉडेल्स लवकरच लाँच करणार आहे. या कार्स लाँच करण्याआधी टाटाने या तीन इलेक्ट्रिक एसयूव्हीचा टीजर लाँच केला आहे. ११ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या Auto Expo २०२३ मध्ये टाटा मोटर्स सहभागी होणार आहे. यामध्ये कंपनी टाटा सफारी ईवी (Tata Safari EV), टाटा हैरियर ईवी (Tata Harrier EV) और टाटा अल्ट्रोज ईवी (Tata Altroz EV) लाँच करू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Auto Expo 2023: शाहरुख खानने लाँच केली Hyundai ची ‘ही’ कार, एकदा चार्ज केली की…; पाहा आकर्षक फिचर्स

टाटा अल्ट्रोझ ईवी ही गाडी कंपनीने याआधीच २०१९ मध्ये जेनोवो कार शो मध्ये लाँच केली आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, टाटा पहिल्यांदा याच गाडीचे लाँचिंग करणार आहे. कारण जेनोवो कार शो मध्ये लाँच केल्यावर याचे प्रॉडक्शन सुरु करायचे होते मात्र कोरोना महामारीमुळे कंपनीने याचे प्रॉडक्शन आणि लाँचिंग करणे टाळले होते. Tata Motors Altroz ​​EV मध्ये तोच बॅटरी पॅक ऑफर करणार आहे, जो सध्याच्या Nexon EV मध्ये दिला आहे. ज्यामध्ये कंपनी परमनंट मॅग्नेट इलेक्ट्रिक मोटर जोडेल जी १२५ बीएचपी पॉवर आणि २४५ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 11 January: पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील चढ-उतार कायम; जाणून घ्या तुमच्या शहरांतील किंमती

टाटा सफारी ईवी आणि हॅरिअरचे बॅटरी पॅक कसे असणार ?

टाटा कंपनी या एसयूव्हीमध्ये ६० kWh आणि ६५ kWh क्षमता असणारी बॅटरी पॅक देऊ शकते. यामुळे या एसयूव्ही ४५० ते ५०० किमी अंतर गाडी धावू शकते. टाटा मोटर्सकडे सर्वाधिक इलेक्ट्रिक कार असून ज्यामध्ये टाटा टिगॉर ईवी, टाटा नेक्सन ईवी मैक्स, टाटा नेक्सन ईवी प्राइम, टाटा टियागो ईवी समावेश आहे आणि लवकरच या यादीमध्ये टाटा सफारी ईवी , टाटा हैरियर ईवी और टाटा अल्ट्रोज ईवी या इलेक्ट्रिक कार्सचा समावेश होणार आहे.

Tata Sierra EV

ऑटो एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सने सिएरा ईव्ही सुद्धा लाँच केली ज्याची कोणाला शक्यताही वाटत नव्हती. हे मॉडेल २०२० मध्येही दाखवण्यात आले होते. मात्र आताचे मॉडेल हे अपडेट करण्यात आले आहे. आणि टाटा मोटर्सने दाखवलेल्या संकल्पनेपेक्षा ते अगदी वेगळे दिसत आहे. Sierra EV ला पूर्णपणे बंद लोखंडी जाळी आणि मोठा बंपर मिळतो. दोन्ही हेडलॅम्प क्रोम स्ट्राइपने जोडलेले आहेत.

हेही वाचा : Auto Expo 2023: शाहरुख खानने लाँच केली Hyundai ची ‘ही’ कार, एकदा चार्ज केली की…; पाहा आकर्षक फिचर्स

Tata Curvv

Tata Curvv हे मॉडेल कंपनीने सर्वात पहिल्यांदा इलेक्ट्रिक मॉडेल म्हणून सादर केले होते. २०२४ मध्ये हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जाणार आहे.

Tata Avinya

टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पो २०२३मध्ये सर्व नवीन Avinya चे मॉडेल्स लाँच केले आहेत. ही कार ५०० किमी धावू शकते. टाटा ही कार २०२५ मध्ये लाँच करेल अशी अपेक्षा आहे. हे मॉडेल जनरेशन ३ या प्लॅटफॉर्मवर आधारित असे मॉडेल आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata motors will soon launch tata safari tata harrier and tata altroz electric cars at auto expo 2023 tmb 01