Nano Solar Car: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना इलेक्ट्रिक कार घेणे भाग पडले आहे. गेल्या काही वर्षांत भारतात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीतही झपाट्याने तेजी आली आहे. मात्र, जास्त किंमत आणि चार्जिंगच्या समस्यांमुळे अनेक लोक इलेक्ट्रिक कार घेणे टाळत आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाने अशी अद्भुत गोष्ट केली आहे की, ते पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. व्यावसायिकाने आपल्या जुन्या कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या कारला चार्ज करण्यासाठी विजेची गरज नाही. ही कार सूर्यप्रकाशाने चार्ज होऊ शकते.
30 रुपयांमध्ये 100 किमी धावणार
१०० किलोमीटरपर्यंत पेट्रोलशिवाय सोलर कार चालवण्यासाठी सुमारे ३० रुपयांपर्यंत खर्च येतो. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे कारमध्ये इंजिन नाही. ते इलेक्ट्रिक वाहनांसारखे शांत आहे. ही कार ८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. ३० रुपये प्रति १०० किमी कारच्या बॅटरीची किंमत आहे.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ दोन SUV चा देशभरात जलवा, लाँच होण्यापूर्वीच ३८ हजार बुकिंगचा धमाका! )
पेट्रोल कारचे सोलर कारमध्ये रूपांतर करणाऱ्या व्यक्तीचे नाव मनोजित मंडल आहे. व्यवसायाने व्यावसायिक असलेल्या मनोजित यांच्याकडे टाटा नॅनोची जुनी कार होती. लहानपणापासून काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची इच्छा असल्याचे मनोजित सांगतो. अनेक वर्षे मेहनत करून त्यांनी सौर तंत्रज्ञान विकसित केले आहे. मात्र, सुरुवातीला त्यांच्या या कल्पकतेला पाठिंबा नसल्याने सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या टाटा नॅनोचे सोलर कारमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मनोजित मंडल सौरऊर्जेवर चालणार्या टाटा नॅनो कारमध्ये बांकुराच्या रस्त्यावर फिरत आहेत.
नॅनो ही एक कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार आहे जी २००८ मध्ये टाटा मोटर्सने लाँच केली होती. तथापि, कठोर उत्सर्जन नियमांमुळे टाटाला २०१८ मध्ये भारतातील सर्वात लहान कार बंद करावी लागली. नॅनो ही भारतातील सर्वात स्वस्त कार देखील होती ज्याची सुरुवातीची किंमत १ लाखांपेक्षा कमी होती. टाटा नॅनोला भारतीय कारमधील सर्वात लहान इंजिनांपैकी एक दिले जात असे. २ सिलेंडर ६२४ सीसी इंजिनसह येणारी कार, ३८ पीएस पॉवर जनरेट करू शकते. चार सीटर नॅनो फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह आली होती.