भारतीय वाहन बाजारात टाटा मोटर्सचा नेहमीच बोलबाला पाहायला मिळतो. या कंपनीच्या कार्सची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. टाटा मोटर्स ही देशातील तिसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. कंपनीकडे टाटा नेक्साॅन, पंच, टियागो या सारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सचा संग्रह आहे. परंतु आता टाटा मोटर्स कारबाबत एका व्यक्तीने केलेली तक्रार सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत. खरंतर कारमध्ये खराबी आल्याची तक्रार व्यक्तीने थेट देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी एक ट्विट केले. तसे, या ट्विटचा टाटा मोटर्स किंवा टाटा मोटर्सच्या कारशी काहीही संबंध नव्हता. रतन टाटा यांनी अफगाणिस्तानच्या खेळाडू राशीद खानला दहा कोटी रुपये दिल्याचा असा दावा सोशल मिडियावर व्हायरल होतोय, तो दावा फेक असल्याचे आपल्या ट्विटमध्ये सांगितले. पण या ट्विटला रिप्लाय देतांना एका टाटा नेक्साॅन कारच्या ग्राहकांनं टाटा नेक्साॅन खराब झाल्याची तक्रार टाटांकडे केली. अभिषेक मगर नावाच्या ट्विटर हँडलवरून या ट्विटला उत्तर देताना ही तक्रार करण्यात आली.

(हे ही वाचा : अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला मिळालेल्या आर्थिक मदतीच्या चर्चेवर रतन टाटांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “माझा क्रिकेटशी…”)

अभिषेक मगर यांनी लिहिले की, “सर कृपया टाटा मोटर्सवर लक्ष द्या. ते ग्राहकांना सदोष गाड्या विकत आहेत. मी त्यापैकी एक आहे. माझ्या वडिलांची टाटा नेक्सॉन कार तब्बल सात वेळा खराब झाली आहे. ते अपंग आहेत. मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या टीमने नकार दिला, कृपया याची नोंद घ्या.”

टाटा मोटर्सनं दिलं उत्तर

रतन टाटांच्या ट्विटखाली तक्रार करताच थोड्या वेळातच टाटा मोटर्सच्या अधिकृत हँडलवरुन उत्तर देण्यात आले. त्यांनी उत्तरात लिहिले, “नमस्कार अभिषेक, आम्हाला तुमच्या चिंतेचे कारण पूर्णपणे समजले आहे. कृपया आमच्या टीमला याची चौकशी करण्यासाठी थोडा वेळ द्या. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू. तुमच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत.” असे उत्तर टाटा मोटर्सने दिले.