Tata Nexon CNG: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या CNG पोर्टफोलिओचा विस्तार करून सणासुदीच्या आधी कारप्रेमींना आनंदाचा धक्का दिला आहे. Tata Motors ने अधिकृतपणे नवीकोरी Nexon iCNG कार देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी लॉन्च केली आहे. आकर्षक लूक आणि पॉवरफूल इंजिनने सुसज्ज असलेल्या या CNG SUV ची सुरुवातीची किंमत ८.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

Tata Nexon CNG मध्ये काय आहे खास

या नवीन मॉडेलच्या लॉन्चसह Tata Nexon ही देशातील पहिली कार बनली आहे जी पेट्रोल, डिझेल, CNG आणि अगदी इलेक्ट्रिक व्हर्जनमध्येदेखील उपलब्ध आहे. कंपनीने Nexon CNG एकूण आठ व्हेरियंट्समध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये स्मार्ट (ओ), स्मार्ट प्लस, स्मार्ट प्लस एस, प्युअर, प्युअर एस, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह प्लस आणि फियरलेस प्लस एस यांचा समावेश आहे.

Vishal Bariya
इन्फ्रास्ट्रक्चर फंड : स्वयंप्रकाशित तू तारा…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
now even Apple is using AI
विश्लेषण : ॲपलचीही आता एआयवर भिस्त… पण या शर्यतीत उशीर झाला का?
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
Hyundai Exter New Variants Launched
Hyundai Exter चे दोन नवे व्हेरिएंटचे लाँच, जाणून घ्या ‘या’ एसयुव्हीचे फीचर्स अन् किंमत
Recognition of prize shares by Reliance Industries
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून १:१ बक्षीस समभागास मान्यता

हेही वाचा… ५ लाखांपर्यंत खरेदी करा Maruti Suzukiची ‘ही’ फॅमिली कार; स्पोर्टी लूक, ड्युअल एअरबॅग्जसह मिळणार ‘हे’ दमदार फिचर्स

या एसयूव्हीच्या लूक आणि डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही अगदी नवीन फेसलिफ्ट मॉडेलसारखी आहे. यात स्प्लिट-हेडलॅम्प सेटअप आहे.

पॉवर, परफॉर्मन्स आणि मायलेज

Nexon CNG मध्ये कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येते. यामध्ये कंपनीने आपली ड्युअल-सिलेंडर टेक्नॉलॉजी वापरली आहे. म्हणजेच कारमध्ये दोन लहान सीएनजी सिलिंडर वापरण्यात आले आहेत, जेणेकरून तुम्हाला बूट स्पेसमध्ये तडजोड करावी लागणार नाही. यात 321 लीटरची बूट स्पेस आहे. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 99bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही CNG SUV 24 किमी/किलो मायलेज देईल.

केबिन आणि इंटेरियर

Tata Nexon फेसलिफ्टच्या केबिनला नव्या पद्धतीने डिझाइन केलं आहे, ज्यात टचस्क्रीन सेट-अप आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह, कर्व्ह कॉन्सेप्ट वापरली आहे. यात AC व्हेंट्सला थोडं पातळ केलं आहे, तर तुम्हाला डॅशबोर्डवर कमी बटणे पाहायला मिळतील.

हेही वाचा… घरच्या घरी करा बाईक सर्व्हिसिंग आणि वाचवा पैसे, दमदार परफॉरमन्ससह मिळेल भरपूर मायलेज

सेंट्रल कन्सोलमध्ये दोन टॉगल दिले गेले आहेत, जे टच-बेस्ड HVAC कंट्रोल पॅनलने वेढलेले आहेत. डॅशबोर्डला कार्बन-फायबरसारख्या फिनिशिंगसह लेदर इन्सर्टदेखील मिळतो. यात फ्री-स्टँडिंग 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आहे आणि दुसरी स्क्रीन म्हणून, 10.25-इंच फूल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे, जे नेव्हिगेशनसाठीदेखील कस्टमाइझ केले जाऊ शकते.

Tata Nexon CNG फीचर्स

टॉप-स्पेसिफिकेशन असलेल्या Nexon मध्ये 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, वायरलेस चार्जर, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर इत्यादींचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्ज, ESC, सर्व सीट्ससाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX तसेच इमर्जन्सी आणि ब्रेकडाउन कॉल असिस्टंटची सुविधा देण्यात आली आहे.