Tata Nexon: भारतात सीएनजी कारची विक्री वाढू लागली आहे. त्यामुळेच कंपन्या देखील जास्तीत जास्त सीएनजी वाहनं लाँच करत आहेत. मारुती सुझुकी कंपनी या बाबतीत आघाडीवर आहे. टाटा मोटर्स कंपनी या बाबतीत मारुतीला आव्हान देऊ पाहात आहे. कंपनी भारतात टियागो आणि टिगॉर कारचं सीएनजी व्हेरिएंट विकते. आता कंपनी देशातली सर्वाधिक विक्री होणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनचं सीएनजी मॉडेल लाँच करणार आहे. आता हे नेक्सॉनचे सीएनजी व्हेरिएंट कंपनी ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर करणार असल्याची माहिती आहे.
Tata Nexon CNG व्हेरिएंट फीचर्स
टाटा नेक्सॉन सब-फोअर मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वात सुरक्षित कार मानली जाते. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या एसयूव्हीला फाइव्ह-स्टार रेटिंग मिळालं आहे. या पावरफूल कारला बाजारात १.२ लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर टर्बो डिझल इंजिनसह लॉन्च करण्यात आलं होतं. आता टाटा मोटर्स आपल्या सीएनजी पोर्टफोलिओला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतंच याअंतर्गत टाटानं टियागो आणि टिगोर कार सीएनजी मॉडल लॉन्च केलं गेलं होतं. आता टाटा नेक्सॉन देखील सीएनजी व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे. टाटा नेक्सॉन या वर्षी सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये होती. त्याचवेळी टाटाच्या लाँच टियागोलाही विक्रमी बुकिंग मिळाले आणि ते सातत्याने बुक होत आहे.
(हे ही वाचा << Auto Expo 2023: बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतेय Hyundai Creta CNG; मारुतीच्या ग्रँड विटारा, हायरायडरला देणार टक्कर )
Tata Nexon CNG व्हेरिएंटचे ब्रेझाशी होणार टक्कर
Tata Nexon CNG व्हेरिएंट ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर होणार असून आता मारुती आपल्या कॉम्पॅक्ट SUV Brezza चे CNG व्हेरियंट देखील लाँच करणार आहे. अशा स्थितीत ब्रेझा आणि नेक्सॉन सीएनजी यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे. मारुतीने सीएनजी व्हेरिएंट लाँच करण्याची तारीख जाहीर केली नसली तरी ब्रेझा सीएनजी ऑटो एक्स्पो दरम्यानच लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा << Auto Expo 2023: जानेवारीमध्ये Maruti Suzuki करणार धमाका; सोबतच इलेक्ट्रिक कारही येणार )
Tata Nexon CNG व्हेरिएंट किंमत
टाटा नेक्सॉनचे सीएनजी व्हेरिएंट १० लाख रुपयांच्या आत लाँच केले जाऊ शकते. Nexon CNG व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ९ लाख रुपये असू शकते. म्हणजेच Nexon CNG टाटा Nexon ev पेक्षा पाच लाख रुपयांनी स्वस्त मिळू शकते.