Tata Nexon CNG vs Tata Punch CNG : टाटा मोटर्सच्या प्रत्येक गाड्यांकडे ग्राहकांचे लक्ष आहे. टाटा मोटर्सने अधिकृतपणे बहुप्रतिक्षित Nexon iCNG लाँच केले आहे. टाटा मोटर्सच्या मिड-लेवल नेक्सन सीएनजी आणि टाटा पंच सीएनजी मध्ये कोणती गाडी तुमच्यासाठी सोयीस्कर आहे? त्यांच्या किंमती, फीचर्स आणि इंजिन कसे आहेत? याविषयी आज आपण जाणून घेऊ या.
किंमत (Tata Nexon CNG vs Tata Punch CNG)
नेक्सन सीएनजीची एक्स शोरूम किंमत ९ लाखांपासून १४.६० लाखापर्यंत आहे. तर पंच सीएनजीची एक्स शोरूम किंमत ७.२३ लाखांपासून ९.९० लाखापर्यंत आहे. या किंमतीच्या आधारावर ९.९० लाख रुपयांचा पंच एक्म्पलिश्ड + सनरूफ, १० लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमत असणाऱ्या नेक्सन स्मार्ट + बरोबर स्पर्धा करतो.
इंजिन आणि डायमेंशन (Tata Nexon CNG vs Tata Punch CNG)
नेक्सन भारतातील पहिले सीएनजी वाहन आहे जे टर्बो पेट्रोलद्वारे इंजिन देते. हे इंजि १.२ लीटर सह ५ हजार आरपीएम वर ९९ बीएचपी आणि २ हजार ते ३ हजार आरपीएमवर १७७ एनएम टॉर्क जनरेट करते. याला ६-स्पीड मॅनुअल गियरबॉक्सबरोबर जोडण्यात आले आहेत. याशिवाय पंच सीएनजीमध्ये १.२ लीटर नॅचरल एस्पिरेटेड पावरट्रेन आहे जे ६ हजार आरपीएम वर ७२.५ बीएचपी आणि ३,२५० आरपीएम वर १०३ एनएम आउटपुट देते.
दोन्ही सब-4 मीटर एसयूव्ही आहेत, परंतु मायक्रो व्हेहिकल पंच, लांबीने १६८ मिमी लहान, ६२ मिमी अरुंद आणि उंचीने फक्त ५ मिमी कमी आहे. व्हिलबेसच्या बाबतीत, पंचच्या २,४४५ मिमीच्या तुलनेत Nexon २,४९८ एमएम आहे. दोन्ही एसयुव्ही मध्ये दोन सीएनजीच्या टँक आहेत. याची क्षमता ६० लीटर आहे.
फीचर्स ( Tata Nexon CNG vs Tata Punch CNG)
नेक्सन सीएनजी स्मार्ट + एस एलईडी हेडलाइट्स, डीआरएल आणि टेल लँप, एक इल्यूमिनेटेड लोगोबरोबर दोन-स्पोक स्टीयरिंग व्हील, चार स्पीयर्सबरोबर सात-इंच हरमन टच स्क्रीन आणि वायर्ड अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले, इलेक्ट्रिकली एडजस्टेबल ओआरवीएम, ऑटो हेडलँप, वॉयस-असिस्टेड सिंगल पॅनल सनरूफ, रेन-सेंसिंग वायपर आणि रूफ रेलनी सुसज्ज आहे. नेक्सन सीएनजीमध्ये सहा एअरबॅग, आईएसओफिक्स सीट, हिल होल्ड कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम इत्यादी फीचर्स आहेत.
पंच एक्म्प्लिश्ड + सनरूफ ट्रिम मध्ये सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेबरोबर १०.२५ इंचची टचस्क्रीन, 16 इंचीचे अलॉय व्हील, ऑटो फोल्डिंग ORVM, LED DRL आणि टेल लँपसह हॅलोजन हेडलाइट्स, रिव्हर्स पार्किंग कॅमरा, पडल लँप सह ऑटो हेडलाइट्स, रेन सेंसिंग वायपर, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, वायरलेस चार्जर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, मल्टीपल चार्जिंग पोर्ट आणि फॉग लँप फीचर्स आहेत. पंच CNG मध्ये डुअल एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ९० डिग्री डोर ओपनिंग आणि पूर्णपणे ऑटोमैटिक क्लायमेट कंट्रोल मिळतो.