EV sales: जगभरात इंधनाचे दर वाढत आहेत. भारतात तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. आताच्या घडीला देशात इलेक्ट्रिक सेगमेंट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे आणि या EV सेगमेंटमध्ये TATA मोटर्स सर्वांत आघाडीवर असून, आपले या क्षेत्रातील वर्चस्व राखून ठेवले आहे. टाटा मोटर्सची Tata Nexon EV ही प्रचंड लोकप्रिय ठरलेली कार आहे. या कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करून, कारची विक्रमी विक्री केली आहे. यातच आता Tata Nexon EV ही देशातील आघाडीची कार ठरली आहे.
Tata Nexon EV कारची विक्रमी विक्री
नोव्हेंबर २०२२ मध्ये Tata Nexon EV या कारची विक्रमी विक्री झाली आहे. गेल्या महिन्यात Tata Motors ने Nexon EV च्या ३५ हजारांहून अधिक युनिट्सची विक्री करून एक नवीन विक्रम केला आहे. यावेळी ही देशातील नंबर वन ईव्ही बनली आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने Nexon EV च्या १४,५१८ युनिट्सची विक्री केली, म्हणजेच त्यांच्या विक्रीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
(आणखी वाचा : नोव्हेंबर महिन्यात वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री; ‘ही’ कार कंपनी ठरली देशात अव्वल! )
Tata Nexon EV ‘अशी’ आहे खास
टाटा नेक्सॉन मध्ये 40kWh ची बॅटरी पॅक पाहायला मिळतो. सध्या नेक्सॉन ईव्हीचे जे मॉडल आहे त्यात 30.2kWh ची बॅटरी पॅक दिले आहे. बॅटरी आणि मोटरवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमी (जे आधीचे असेल) ची वॉरंटी देखील आहे. रिमोट कमांड, वाहन ट्रॅकिंग ते ड्रायव्हिंग वर्तन विश्लेषण, नेव्हिगेशन आणि रिमोट डायग्नोस्टिक्सपर्यंत. Nexon EV सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि डेटोना ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Tata Nexon EV ची किंमत ₹ १४.९९ लाख पासून सुरू होते.