टाटा मोटर्स देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सने Nexon एसयूव्ही लॉन्च केली होती. आता लवकरच कंपनी Nexon फेसलिफ्टचे लॉन्चिंग करणार आहे. नवीन मॉडेलमध्ये नवीन इंटेरिअर आणि देण्यात आलेल्या फीचर्ससह अपडेटेड एक्सटर्नल डिझाइन मिळणार आहे. ज्यामुळे सर्वाधिक विक्री होणारे एसयूव्ही मॉडेल अधिक आकर्षक बनते. आगामी Nexon EV मध्ये देखील हेच डिझाइन बघायला मिळणार आहे. कंपनीने Nexon फेसलिफ्टचे बुकिंग सुरु केले आहे. ग्राहक २१ हजार रुपयांमध्ये या कारचे बुकिंग करू शकणार आहेत.
नवीन Nexon फेसलिफ्ट या आठवड्यात १४ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. त्याआधी याचे बुकिंग सुरु झाले आहे. यावेळी कंपनी कारच्या किंमतीबद्दल देखील खुलासा करणार आहे. बाजारामध्ये ही कार ६ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. लॉन्च होण्यापुर्ण Nexon फेसलिफ्टमध्ये कोणकोणते अपडेट मिळणार आहेत ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
इंजिन आणि बॅटरी
नवीन टाटा Nexon फेसलिफ्ट मिडीयम रेंज आणि लॉन्ग रेंज या दोन पॉवरट्रेनमध्ये लॉन्च केली जाणार आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये ३० KWH क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी १७५ बीएचपी आणि २१५ एनएम टॉर्क जनरेट करते. नवीन मॉडेलमध्ये ४०.५ kWH क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. जे १४३ बीएचपी पॉवर आणि २१५ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.
सध्याचे Nexon EV मॉडेल एकदा चार्ज केली की ३२५ किमी धावू धावण्यास सक्षम आहे असा कंपनीचा दावा आहे. तर नवीन मॉडेलमधील LR व्हेरिएंट देखील सिंग चार्जमध्ये ४६५ किमी इतकी धावू शकेल असा कंपनीने दावा केला आहे. परफॉर्मन्स बद्दल बोलायचे झाल्यास नवीन फेसलिफ्ट मॉडेल ८.९ सेकंदांत ० ते १०० किमी टीका वेग पकडू शकते. याचा प्रतितास वेग हा १५० किमी इतका आहे. यामध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड मिळणार आहेत.