टाटा मोटर्स देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी टाटा मोटर्सने Nexon एसयूव्ही लॉन्च केली होती. आता लवकरच कंपनी Nexon चे फेसलिफ्टचे लॉन्चिंग करणार आहे. नवीन मॉडेलमध्ये नवीन इंटेरिअर आणि देण्यात आलेल्या फीचर्ससह अपडेटेड एक्सटर्नल डिझाइन मिळणार आहे. ज्यामुळे सर्वाधिक विक्री होणारे एसयूव्ही मॉडेल अधिक आकर्षक बनते. आगामी Nexon EV मध्ये देखील हेच डिझाइन बघायला मिळणार आहे. आता आपण टाटा Nexon मॉडेलला मिळणाऱ्या अपडेट्सबद्दल जाणून घेऊयात.
पुन्हा डिझाइन केलेले डीआरएल, हेडलाईट्स आणि फ्रंट सेक्शनमुळे नवीन टाटा नेक्सॉन खूपच आकर्षक दिसते. यामध्ये नवीन डिझाइन असलेले व्हील्स, एलईडी हेडलॅम्प्स आणि फंक्शनल फ्रंट बंपर देण्यात येणार आहे. अपडेटेड टेल लॅम्पसह नवीन टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट जांभळा, निळा, राखाडी, गडद राखाडी, पांढरा आणि लाल या सहा रंगांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे.
फीचर्स
अपकमिंग नेक्सॉन फेसलिफ्टच्या इंटेरिअरमध्ये देखील अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. बाजारात येणाऱ्या या एसयूव्हीमध्ये टू-स्पोक स्टिअरिंग व्हील, टच ऑपरेटेड FATC पॅनल, JBl चे स्पीकर, १०.२५ इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, सनरूफ, रिअर एसी व्हेन्ट, कनेक्टड कार टेक सारखे अनेक फीचर्स मिळणार आहेत. तसेच ६ एअरबॅग्स, ३६० डिग्री कॅमेरा, EBD सह ABS , रिव्हर्स कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर, इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स देखील मिळणार आहेत.
इंजिन
नवीन टाटा Nexon फेसलिफ्ट फ्युएल इंजिन आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाईल. फ्युएल इंजिनच्या पर्यायांमध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन मिळेल हे ५-स्पीड गिअरबॉक्ससह जोडेलेले असेल. हे इंजिन ११८ बीएचपी पर्यंत पॉवर जनरेट करेल. ५स्पीड मॅन्युअलशिवाय यामध्ये -स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड AMT आणि ७-स्पीड DCT गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. अपकमिंग नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये १.५ लिटरच्या डिझेल इंजिन व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध होणार आहे. टाटा मोटर्सची ही अपकमिंग Nexon एसयूव्ही १४ सप्टेंबरला भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होणार आहे.