Tata Nexon XE Finance Plan: कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची मागणी भारतात झपाट्याने वाढत आहे, हे लक्षात घेऊन मारुती सुझुकीपासून महिंद्रापर्यंत जवळपास प्रत्येक कंपनीने आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात आणली आहे. ज्यामध्ये आज आम्ही Tata Nexon बद्दल बोलत आहोत, जी टाटा मोटर्सची सर्वाधिक विक्री होणारी एक कार आहे, जी तिच्या डिझाइन, इंजिन, फीचर्स आणि किंमतीमुळे पसंत केली जाते. आज तुम्हाला Tata Nexon बेस मॉडेलची किंमत,आणि फायनान्स प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Tata Nexon XE ची बेस मॉडेल किंमत किती?

Tata Nexon XE ची सुरुवातीची किंमत म्हणजेच बेस मॉडेल ७,६९,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. रस्त्यावर, बेस मॉडेलची किंमत ८,६३,७७४ रुपये आहे. जर तुम्हाला ही कार रोख पेमेंटमध्ये खरेदी करायची असेल तर त्यासाठी ८.६ लाख रुपये लागतील.

जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल, तर येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही फक्त ५०,००० रुपयांचे सहज डाउन पेमेंट भरून ही कार घरी नेऊ शकता.

(हे ही वाचा : 50 हजारांपेक्षा कमी किंमतीतील ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळेल मोठ्या रेंजची हमी )

Tata Nexon Base Model फायनान्स प्लॅन

ही कार खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट ५०,००० रुपये असेल, तर ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक या कारसाठी ८,१३,७७४ रुपयांचे कर्ज देऊ शकते. या कर्जावर बँक वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.

Tata Nexon Base Model डाउन पेमेंट प्लॅन

एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला या SUV साठी ५०,००० रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने कर्जाची परतफेड करण्यासाठी ठरवलेल्या ५ वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला १७,२१० रुपये मासिक EMI जमा करावे लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata nexon xe finance plan base model of tata nexon with 5 star safety rating will be available by paying 50 thousand pdb
Show comments