Best Selling SUV Car: ऑटो क्षेत्रातील कारच्या दुनियेत सध्या एसयुव्ही गाड्यांचा बोलबाला आहे. भारतातील कार ग्राहकांमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीला मोठी मागणी दिसून येत आहे. लोक छोट्या हॅचबॅकमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची वाहने घेण्यास प्राधान्य देत आहेत. कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आपल्या आकर्षक डिझाईन आणि परफॉर्मन्समुळे खूप लोकप्रिय होत आहेत. आता यातच देशातील बाजारपेठेत एका कारनं विक्रीच्या बाबतीत मोठी मजल मारली आहे. देशातील ग्राहक या कारच्या प्रेमात पडले आहेत, चला तर जाणून घेऊया कोणती आहे ही कार…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ SUV वाहनांचा वाटा ५२ टक्के होता. या कालावधीत टाटा पंच या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटच्या कारने पहिले स्थान मिळवले. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत पंचची एकूण विक्री १,१०,३०८ होती. तर गेल्या वर्षी याच महिन्यात पंचची विक्री केवळ ६७,११७ गाड्यांची होती.

Hyundai Creta ने SUV विक्रीत दुसरे स्थान मिळवले. Hyundai Creta ने या कालावधीत १०.६४ टक्के वार्षिक वाढीसह ९१,३४८ गाड्यांची विक्री केली. तर बरोबर एक वर्षापूर्वी याच कालावधीत Hyundai Creta ने ८२,५६६ SUV ची कारची विक्री केली होती.

(हे ही वाचा : किंमत ५.७३ लाख, मायलेज ३४ किमी; देशातील बाजारात ‘या’ ५ स्वस्त सीएनजी कारला तुफान मागणी, पाहा यादी )

ब्रेझा आणि फ्रॉन्क्सच्या विक्रीतही मोठी वाढ

विक्रीच्या या यादीत मारुती सुझुकी ब्रेझा तिसऱ्या स्थानावर होती. मारुती ब्रेझाने या कालावधीत ९.६८ टक्के वार्षिक वाढीसह एकूण ९०,१३५ गाड्यांची विक्री केली. तर विक्रीच्या या यादीत महिंद्रा स्कॉर्पिओ चौथ्या क्रमांकावर होती. महिंद्रा स्कॉर्पिओने या कालावधीत ६३.९७ टक्के वार्षिक वाढीसह एकूण ८५,३२६ गाड्यांची विक्री केली.

याशिवाय विक्रीच्या या यादीत टाटा नेक्सॉन पाचव्या स्थानावर आहे. Tata Nexon ने या कालावधीत ८.२० टक्क्यांच्या वार्षिक घसरणीसह एकूण ८०,३२६ गाड्यांची विक्री केली. तर विक्रीच्या या यादीत मारुती सुझुकी फ्रॉन्क्स सहाव्या क्रमांकावर आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने या कालावधीत १८९.०५ टक्के वार्षिक वाढीसह एकूण ७६,९९७ गाड्यांची विक्री केली.

विक्रीच्या या यादीत मारुती सुझुकी ग्रँड विटारा सातव्या क्रमांकावर आहे. या कालावधीत, मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या एकूण ६२,७३८ गाड्यांची वार्षिक १४.०८ टक्के वाढीसह विक्री झाली, तर ह्युंदाई व्हेन्यु या विक्रीच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. Hyundai Venue ने ६.६८ टक्क्यांच्या वार्षिक घसरणीसह एकूण ५८,७१५ गाड्यांची विक्री केली आहे.

याशिवाय महिंद्रा बोलेरो विक्रीच्या या यादीत नवव्या क्रमांकावर होती. महिंद्रा बोलेरो एसयूव्हीच्या एकूण ५५,३५२ गाड्यांची विक्री झाली आहे. तर विक्रीच्या या यादीत किआ सोनेट दहाव्या क्रमांकावर होती. Kia Sonet ने या कालावधीत ०.३५ टक्के वार्षिक वाढीसह ५४,३२२ गाड्यांची एकूण SUV विक्री गाठली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata punch becomes the fastest best selling compact suvs in india pdb