भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह ब्रँड टाटा मोटर्स आपली नवीन स्पेशल एडिशन्स आणि व्हेरियंटसह सध्याची उत्पादन लाइनअप अपडेट करत आहे. सणासुदीच्या अगोदर, कार निर्माता टाटा आपल्या पंच एसयूव्हीची ‘टाटा पंच कॅमो एडिशन’ सादर करणार आहे.
कंपनीने त्याचा टीझर प्रदर्शित केला आहे, या टीझरमध्ये टाटा पंच कॅमो एडिशन २२ सप्टेंबर रोजी सादर होईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, व्हिडीओ टीझरवरून या स्पेशल एडिशनबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही. तथापि, हेडलॅम्प, अलॉय व्हील्स आणि साइड फेंडर्सवर CAMO बॅजिंग दिसू शकते. यासह, नियमित मॉडेलच्या तुलनेत यात काही कॉस्मेटिक बदल होऊ शकतात.
आणखी वाचा : महिंद्राच्या ग्राहकांना मोठा झटका! लोकप्रिय SUV बोलेरो झाली महाग, जाणून घ्या किंमतीत झाला किती बदल
टाटा पंच कॅमो एडिशनची वैशिष्ट्ये
- टाटा पंच कॅमो एडिशन निवडक ट्रिममध्ये ऑफर केले जाईल. हॅरियर कॅमो एडिशन प्रमाणेच, हे हिरव्या रंगाच्या योजनेमध्ये ऑफर केले जाऊ शकते. यात ब्लॅक फिनिश अलॉय व्हील्स आणि काळ्या पट्ट्यासह टेलगेट मिळू शकतात. कंपनी त्याच्यासोबत एक ऍक्सेसरी पॅकेज देखील देऊ शकते.
- नवीन पंच स्पेशल एडिशनच्या इंटीरियरमध्ये स्पोर्टी ऑल-ब्लॅक थीम असू शकते. डॅशबोर्डवर कॉन्ट्रास्ट कॅमो ग्रीन स्टिचिंग आणि ब्लॅकस्टोन मॅट्रिक्स ट्रिमसह ब्लॅक लेदर सीट त्याच्या स्पोर्टी लुकमध्ये भर घालतील.
- ही विशेष आवृत्ती टॉप-एंड ट्रिमवर आधारित असेल. ७.०-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पॉवर फोल्डिंग विंग मिरर, पुडल लॅम्प्स, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, रीअर सीट सेंटर आर्मरेस्ट, LED DRLs, वायपर्ससह ऑटो हेडलॅम्प आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प्स यांसारखी वैशिष्ट्ये ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे.
- त्याच्या इंजिन सेटअपमध्ये कोणताही बदल होणार नाही. टाटा पंच कॅमो एडिशन मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्ससह १.२-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. हे ८६bhp ची कमाल पॉवर आणि ११३ एनएम चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. इंजिन स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह उपलब्ध असेल.