Tata Punch CAMO Special Edition Price Features: टाटा मोटर्सने सर्वाधिक विक्री होणाऱ्या टाटा एसयूव्ही पंचचे नवे एडिशन लाँच केले आहे. त्याचे नाव आहे टाटा पंच कॅमो स्पेशल एडिशन. नवीन सीवीड ग्रीन कलर आणि व्हाईट रुफची ही छोटी एसयूव्ही कारचा बाहेरील लूकही अतिशय आकर्षक आहे. कंपनीने या नव्या कारमध्ये अनेक अप्रतिम फीचर्स दिले आहेत. टाटा पंचच्या तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत चार लाख युनिट्सची विक्री झाली, त्यामुळे कंपनीने आता सणासुदीच्या हंगामात पंच कॅमो एडिशन लाँच केल्याने ग्राहकांना एक नवीन पर्याय मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंमत आणि फीचर्स काय आहेत जाणून घेऊ?

टाटा पंच कॅमो स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम प्राइस ८ लाख ४४ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते. टाटा मोटर्सच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही एसयूव्ही बुक करू शकता. टाटा पंचच्या स्पेशल कॅमो एडिशन मॉडेलबद्दल सांगायचे झाल्यास, त्यात R16 चारकोल ग्रे अलॉय व्हील आणि कॅमो थीम पॅटर्नसह प्रीमियम अपहोल्स्ट्री देण्यात आले आहे, तसेच फर्स्ट इन सेगमेंटमधील 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो Apple CarPlay ला सपोर्ट करते.

टाटा पंच कॅमो स्पेशल एडिशनच्या इतर फीचर्सबद्दल सांगायचे तर यात वायरलेस चार्जर, रियर एसी व्हेंट्स, फास्ट सी-टाइप यूएसबी चार्जर, आर्मरेस्टसह मोठा कन्सोल यांसह इतर काही खास फीचर्स आहेत. या एसयूव्हीमध्ये ११९९ सीसी पेट्रोल इंजिन आहे, जे ८७ बीएचपी पॉवर आणि ११५ न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज असलेली ही टाटा पंच कॅमो २०.०९ kmpl पर्यंत मायलेज देते.

तुमच्या कार, बाईकला रंग बदलण्याआधी वाचाच ‘हे’ नियम! अन्यथा भरावा लागू शकतो दंड

टाटा पंच कॅमो स्पेशल एडिशन लाँच करताना, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवास्तव म्हणाले की, ऑक्टोबर २०११ मध्ये लाँच झाल्यापासून, टाटा पंचच्या आकर्षक डिझाईन, लॅविश इंटीरियर, जबरदस्त परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट सेफ्टी फीचर्सनी ग्राहकांची मनं जिंकली आहे. टाटा पंच हे या आर्थिक वर्षात सर्व सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. वाढत्या मागणीनुसार आता आम्ही पंचचे एक लिमिटेड CAMO एडिशन पुन्हा लाँच करत आहोत, ही कार सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata punch camo special edition launched in india with seaweed green color and white roof and lots of features read details sjr