टाटा मोटर्स ही देशातील एक आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटाने आपल्या ग्राहकांसाठी अनेक कार्स लॉन्च केल्या आहेत. तसेच टाटा मोटर्सने EV क्षेत्रामध्ये देखील आपल्या काही कार्स लॉन्च केल्या आहेत. EV क्षेत्रातील आघाडीची कंपनी पंच सब-कॉम्पॅक्ट SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करण्याच्या तयारीत आहे. सणासुदीच्या काळामध्ये नवीन टाटा पंच EV भारतात लॉन्च केले जाईल. त्याच्या अधिकृत लॉन्चिंगपूर्वी Punch ईव्हीला पुन्हा एकदा टेस्टिंग दरम्यान पाहण्यात आले आहे. टाटा पंच EV मध्ये ICE मॉडेलपेक्षा अधिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
टाटा पंच ईव्ही : डिझाईन आणि फीचर्स
टाटा पंच ईव्हीच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास पंच EV आपल्या ICE मॉडेल्सरखीच सारखीच असेल. काही किरकोळ बदल सोडले तर काही अतिरिक्त फीचर्स पाहायला मिळू शकतात. त्याच्या नवीन फीचर्समध्ये नवीन टू-स्पोक स्टिअरिंग व्हील, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा, चारही चाकांना डिस्क ब्रेक आणि अनेक लेटेस्ट फीचर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिले जातील. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स
पंच ईव्ही ही टाटाची पहिली कार असणार आहे जी ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यामध्ये २५ kWh क्षमतेची बॅटरी असेल. एकदा चार्ज केल्यावर पंच २५० ते ३०० किमी धावेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये देण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरमधून ६० बीएचपी पॉवर जनरेट होईल अशी अपेक्षा आहे. या सब कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
किंमत आणि स्पर्धा
टाटा पंच ईव्ही भारतामध्ये या सणासुदीच्या काळामध्ये लॉन्च केली जाईल. त्याची एक्स-शोरूम किंमत १० लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असल्याचे सांगितले जात आहे. लॉन्च झाल्यानंतर टाटा पंच ईव्ही सिट्रोएन इलेक्ट्रिक कार Citroen eC3 ला टक्कर देईल.