भारतीय वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स बाजारात चांगली कामगिरी करत आहे. मारुती आणि ह्युंदाई पाठोपाठ टाटा मोटर्स देशातली सर्वाधिक वाहनं विकणारी तिसरी कंपनी ठरली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात धुमाकूळ घालत असलेल्या टाटा नेक्सॉन ईव्ही कारचं अधिक रेंज देणारं मॉडेल नेक्सॉन ईव्ही मॅक्स देखील कंपनीने या नुकतेच लाँच केलं. या सर्व मॉडेल्सना बाजारात चांगली डिमांड असल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनी त्यांचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी भारतीय वाहन बाजारात आता लवकरच लोकप्रिय टाटा पंच या कारचा इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Tata Punch EV चे फीचर्स

Tata Punch EV ची स्पर्धा २०२३ मध्ये लाँच होणाऱ्या Citroen eC3 बरोबर होईल. या ईव्हीमध्ये झिपट्रॉन इलेक्ट्रिक इंजिन दिलं जाऊ शकतं. हेच इंजिन टाटा टिगॉर ईव्ही आणि टाटा टियागो ईव्हीमध्ये मिळतं. पंच इलेक्ट्रिक दोन बॅटरी ऑप्शनसह ऑफर केली जाऊ शकते, ज्यामध्ये पंच ईव्ही एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ३०० ते ३५० किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. पंच ईव्हीमध्ये पेट्रोल-डिझेल व्हेरिएंटसह काही इतर कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.

(हे ही वाचा : घरबसल्या फक्त ५,९९० रुपयांमध्ये तुमची जुनी सायकल बनवा ई-सायकल, फक्त करा ‘हे’ काम )

नवीन टाटा पंच EV वरील सुरक्षा फीचर्समध्ये EBD सह ड्युअल एअरबॅग ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, डायनॅमिक गाईडवेसह कॅमेरा-आधारित रिव्हर्स पार्क असिस्ट आणि फॉलो-मी-होम हेडलॅम्प यांचा समावेश असू शकतो. इंटीरियरमध्ये पुश बटण स्टार्ट/स्टॉप, क्रूझ कंट्रोल, ऑटो फोल्ड आणि पूर्णपणे डिजिटल कन्सोलसह ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळण्याची अपेक्षा आहे.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: इव्हेंट, कुठे आणि केव्हा होईल? तुम्हाला प्रवेश कसा मिळेल? कोणत्या कंपन्या करणार वाहने लाँच? जाणून घ्या सविस्तर

Tata Punch EV किंमत

नवीन Tata Punch EV ची किंमत सुमारे ११ लाख ते १३ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata punch ev will be launched at auto expo 2023 punch ev will give a range of 300 to 350 km once fully charged pdb
Show comments