भारतामध्ये स्वस्तात मस्त एसयुव्ही कार विकत घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी टाटा पंच हा एक उत्तम आणि व्हॅल्यू फॉर मनी म्हणता येईल असा पर्याय आहे. विशेष म्हणजे अवघ्या एक लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटवर या गाडीचं मालक होण्याची संधी कंपनीने विशेष ऑफर्सअंतर्गत उपलब्ध करुन दिली आहे. या गाडीची किंमत, डाऊनपेमेंट, महिन्याला किती ईएमआय आणि व्याज लागेल यासंदर्भातील माहिती आपण या लेखामधून जाऊन घेऊयात…
टाटा पंचची किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास या मायक्रो एसयुव्हीला प्युअर, अॅडव्हान्स, अकम्पलिश्ड आणि क्रिएटीव्ह या चार महत्वाच्या प्रकारांमध्ये बाजारात उतरवण्यात आलं आहे. या चार प्रकारांमध्ये एकूण २२ व्हेरिएंट बाजारामध्ये उपलब्ध आहे. या गाडीच्या बेसिक व्हेरिएंटची किंमत ५ लाख ९३ हजारांपासून सुरु होऊन टॉप व्हेरिएंटची किंमत अगदी ९ लाख ४९ हजारांपर्यंत (एक्स शोरुम) आहे. ११९९ सीसीच्या पेट्रोल इंजीनवाल्या या छोट्या एसयुव्हीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार गाडीचे मायलेज हे १८.९७ किलोमीटर प्रती लिटर इतकं आहे. आता ही गाडी घायची असेल तर वाहन कर्ज, ईएमआय आणि डाऊनपेमेंटबद्दलची आकडेमोड पाहूयात
टाटा पंच गाडीचं अकम्पलिश्ड व्हेरिएंटची एक्स शोरुममधील किंमत ही ७ लाख ५० हजार इतकी आहे. ऑन रोड टॅक्स वगैरे सारख्याचा हिशोब लावल्यास ही गाडी ८ लाख ४१ हजार ८५८ रुपयांची आहे. ही गाडी कर्ज काढून घ्यायची असल्यास एक लाख रुपयांच्या डाऊनपेमेंट, प्रोसेसिंग फीबरोबरच ऑन रोड चार्ज आणि पहिल्या महिन्याचा ईएमआय एवढी रक्कम भरुन गाडीचं मालक होता येईल. या गाडीची किंमत ध्यानात घेतल्यास गाडीवर ७ लाख ४१ हजार ८५८ रुपयांचं कर्ज वाहन कर्जाअंतर्गत मिळू शकतं. कार देखोवरील ईएमआय कॅलक्युलेटरनुसार ९.८ टक्के दराने व्याज भरल्यास दर महिन्याला या कारसाठी १५ हजार ६८९ रुपयांचा हफ्ता भरावा लागेल.
वरील सर्व अटी आणि शर्थी तसेच व्याजाची रक्कम पहिल्यास या कर्जावरील व्याज हे दोन लाखांपर्यंत असेल. केवळ डाऊनपेमेंटवर ग्राहक गाडी घरी नेऊ शकतात अशी कंपनीची ऑफर असून पुढे पाच वर्ष मसिक हफ्त्यांवर गाडीचं कर्ज फेडण्याची मूभा देण्यात आली आहे.