Tata Punch Micro SUV:  भारतीय बाजारपेठेत आता गाड्यांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष दिले जात आहे. नवीन कार खरेदी करताना, ग्राहकांना हे देखील जाणून घ्यायचे असते की, वाहनाला किती तारांकित सुरक्षा रेटिंग आहे. अपघात झाल्यास गाडीत बसलेले प्रवासी किती सुरक्षित असतील हे गाडीचे सेफ्टी रेटिंग सांगते. ५ स्टार रेटिंग म्हणजे ती सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला अशा स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत, जी ६ लाखांपेक्षा कमी किंमतीत फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देते. म्हणजेच ही देशातील सर्वात स्वस्त कार आहे, जी फाइव्ह स्टार रेटिंग देते.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती टाटा पंच आहे. ही कंपनीची मायक्रो एसयूव्ही आहे, ज्याची किंमत फक्त ६ लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने ते ऑक्टोबर २०२१ मध्ये बाजारात लाँच केले. त्यानंतर लगेचच या कारचे सेफ्टी रेटिंग समोर आले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
traffic cop warden booked for demanding bribe to remove car jammer
मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा

(हे ही वाचा : Innova-Ertiga चे वर्चस्व संपणार, मारुती आणतेय देशातील सर्वात महागडी ७ सीटर MPV कार, किंमत पाहून फुटेल घाम)

5 स्टार सुरक्षा रेटिंग

ग्लोबल एनसीएपी (Global NCAP) क्रॅश चाचणीमध्ये टाटा पंचला पंचतारांकित रेटिंग मिळाले आहे. एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन मध्ये १७ पैकी १६.४५ गुण मिळाले. तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी, ४९ पैकी ४०.९८ गुण मिळाले. टाटा पंचमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि ABS मानक वैशिष्ट्ये आहेत. Nexon आणि Altroz ​​नंतर 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवणारी Tata Punch ही कंपनीची तिसरी कार आहे.

इंजिन आणि पॉवर

टाटा पंचमध्ये १.२-लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे ८६PS पॉवर आणि ११३Nm टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअलसह ५-स्पीड AMT गिअरबॉक्स मिळतो. सीएनजी सुविधाही लवकरच जोडण्यात येणार आहे. या टाटा मायक्रो एसयूव्हीचा ग्राउंड क्लीयरन्स १८७ मिमी आहे.