गेल्या काही वर्षांपासून देशात कारची विक्री चांगली होत आहे. हॅचबॅक, कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एमपीव्हीसह सर्व प्रकारच्या कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. तथापि, आजकाल बाजारात बजेट विभागातील सर्वोत्तम SUV बनण्यासाठी काही वाहन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा रेनॉल्ट, निसान यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या गाड्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. पण या दरम्यान, टाटा मोटर्सची एक स्वस्त एसयूव्ही विक्रीच्या बाबतीत पुढे येत असल्याचे दिसते आहे.
जानेवारी २०२४ मध्ये, मारुती बलेनो ही १९ हजार ६३० युनिट्ससह सर्वाधिक विक्री होणारी कार होती. या कारची विक्री जानेवारी २०२३ च्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक होती. त्याच वेळी, मारुती आणि ह्युंदाईच्या सर्व वाहनांना मागे टाकत टाटा पंच एसयूव्ही ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. टाटाच्या या मिनी एसयूव्हीच्या जानेवारीमध्ये १७ हजार ९७८ युनिट्स विकल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच महिन्यात या एसयूव्हीची १२ हजार ००६ युनिट्स विकली गेली होती. पंच SUV च्या विक्रीत ५० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.
अलीकडेच कंपनीने ते सनरूफसह सीएनजी (पंच सीएनजी) प्रकारात सादर केले आहे. सीएनजीमुळे ते चालवणे आता किफायतशीर झाले आहे. टाटाची ही ५-सीटर SUV ५-स्टार ग्लोबल NCAP सुरक्षा रेटिंगसह येते. पंचची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.५२ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. यात ३६६ लीटरची बूट स्पेस आहे. पंचने बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आहे आणि ब्रेझा, बलेनो आणि डिझायर यांसारख्या मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारशी सातत्याने स्पर्धा करत आहे. आकाराने कॉम्पॅक्ट असूनही, पंचमध्ये ५ लोक बसू शकतील एवढी जागा आहे. या कारमध्ये ३६६ लीटरची बूट स्पेस आहे.
(हे ही वाचा : Royal Enfield, Honda चे धाबे दणाणले, दमदार इंजिनसह हिरोची महागडी बाईक देशात दाखल; बुकींगही सुरु, किंमत… )
कंपनी टाटा पंचमध्ये १.२ लीटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन देत आहे. हे इंजिन ८८ bhp ची कमाल पॉवर आणि ११५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच ५-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. टाटा पंच पेट्रोलमध्ये २०.०९kmpl आणि CNG मध्ये २६.९९km/kg मायलेज देते.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पंचमध्ये ७-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.