Tata Punch iCNG vs Hyundai Exter CNG: ह्युंदाई (Hyundai) आणि टाटा मोटर्स (Tata Motors ) मध्ये भारतातील नंबर वन SUV निर्मात्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या लोकप्रिय मॉडेल्स, पंच आणि एक्स्टरसाठी सीएनजी प्रकार सादर केले आहेत. नवीन मारुती सुझुकी स्विफ्टने बाजी मारली तेव्हा टाटा पंच ही भारतीय बाजारपेठेत सातत्याने सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली. तर आता टाटा पंच सीएनजी आणि ह्युंदाई एक्स्टर सीएनजी (Tata Punch vs Hyundai Exter) यामध्ये कोणती कार बेस्ट आहे, याबद्दल या लेखातून सविस्तर चर्चा करूया.

Tata Punch vs Hyundai Exter: टाटा पंच सीएनजी आणि ह्युंदाई एक्स्टर सीएनजी : डायमेन्शन्स

Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Pushpa 2 News Marathi
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ मधल्या ‘या’ आडनावावरुन करणी सेना आक्रमक, निर्मात्यांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारा

टाटा पंच ही ट्रेडिशनल एसयूव्ही आहे आणि ती एक्स्टरपेक्षा लांब, रुंद आहे. कारण तिची लांबी ३,८२७ मिमी व रुंदी १,७४२ मिमी आहे. ह्युंदाई एसयूव्हीची शेड व्हीलबेस २,४५० मिमी, टाटा पंचपेक्षा ५ मिमी जास्त आहे. पण, कंपनी ट्विन-सिलेंडर CNG टाकीवर स्विच करण्याचा विचार करत आहे. तर टाटा पंच, दुसरीकडे, ट्विन-सिलेंडर सीएनजी लेआउट वापरते आणि २१० लीटरची बूट स्पेस देते.

डायमेन्शनटाटा पंच आयसीएनजीह्युंदाई एक्स्टर सीएसनजी
लांबी३८२७ मिमी३८१५ मिमी
रुंदी१७४२ मिमी१७१० मिमी
उंची१६१५ मिमी१६३१ मिमी
व्हीलबेस २२४५ मिमी२४५० मिमी
ग्राउंड क्लिअरन्स १८७ मिमी १८५ मिमी
बूट स्पेस२१० लिटर

हेही वाचा…Jio vs Airtel: कोणती कंपनी ऑफर करतेय सगळ्यात स्वस्त प्लॅन? कोणता रिचार्ज करायचा? किंमत, डेटा, सबस्क्रिप्शन पाहून ठरवा!

टाटा पंच सीएनजी आणि ह्युंदाई एक्स्टर सीएनजी : फीचर्स

ह्युंदाई एक्स्टरमध्ये सहा एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटर, सर्व पाच सीट्सना आयएसओएफआयएक्स सीट अँकर आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, मागील सेन्सर्स आणि ऑटोमॅटिक हेडलाइट्स, तीन-पॉइंट सीट बेल्ट आहेत. ह्युंदाई वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, दोन १२व्ही पॉवर सॉकेट्स, रीअर हेडरेस्ट्स, समोर एक फास्ट चार्जर टाइप-सी पोर्ट, ८-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आदी फीचर्स आहेत.

टाटा पंचबद्दल सांगायचे झाल्यास ग्लोबल NCAP चाचणीतून ५ स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त करणारं एकमेव वाहन आहे. हे प्रौढ रहिवाशांसाठी ५ स्टार, तर लहान मुलांच्या संरक्षणासाठी चार स्टार रेटिंग प्राप्त करते. टाटा पंचमध्ये ट्विन एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), साइड हेड इम्पॅक्ट प्रोटेक्शन सिस्टम, सर्व सीटसाठी 3-पॉइंट बेल्ट, ब्रेक स्वे कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर्स आणि एक मागील कॅमेरा आहे. व्हॉईस-ॲक्टिव्हेटेड सनरूफ, रेन-सेन्सिंग वायपर्स, फ्रंट आर्मरेस्ट, यूएसबी, टाइप-सी पोर्ट्स आणि सहा स्पीकर्ससह हरमनची ७ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारख्या आरामदायी फीचर्सचा समावेश आहे.

टाटा पंच आयसीएनजी आणि ह्युंदाई एक्स्टर सीएनजी : पॉवर स्पेसिफिकेशन

टाटा पंच आणि ह्युंदाई एक्स्टर दोन्ही १.२ लिटर इंजिनद्वारे परिपूर्ण आहेत. पण, टाटा पंचमध्ये तीन सिलेंडर इंजिन आहे; तर Exter मध्ये CNG सह चार सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. टाटा पंच सीएनजी मोडमध्ये ७२.५ बीएचपी आणि १०३ एनएम आउटपूट देणारे एकमेव वाहन आहे; जे सीएनजी मोडमध्ये सुरू होऊ शकते. इंधन कमी असताना पेट्रोल, सीएनजी मोडमध्ये स्वयंचलित स्विच फंक्शन करण्याची सोयसुद्धा आहे.’

मॉडेल टाटा पंच आयसीएनजीह्युंदाई एक्स्टर सीएनजी
इंजिन१.२ लिटर, ३ सिलेंडर १.२ लिटर, ४ सिलेंडर
पॉवर ७२.५ बीएचपी ६८ बीएचपी
टॉर्क१०३ एनएम ९५.२ एनएम
टान्समिशन५ स्पीड मॅन्युअल ५ स्पीड मॅन्युअल
मायलेज (ARAI) २६.९९ किलोमीटर / किलोग्रॅम २७.१ किलोमीटर / किलोग्रॅम
किंमत ७.२३ लाख८.४३ लाख

तर फीचर्स, किंमत पाहून तुम्हाला कोणती एसयूव्ही खरेदी करायची आहे ते ठरवा…

Story img Loader