Tata punch idle start stop function : टाटाच्या वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाटा टियागोला ग्राहकांची भरपूर पसंती मिळत आहे. त्यानंतर मिनी एसयूव्ही टाटा पंच देखिल बाजारात धुमाकूळ घालत आहे. पंच ही टाटाची बेस्ट सेलिंग एसयूव्ही आहे. मात्र, बेस्ट सेलिंग एसयूव्हीमध्ये फीचर्सची वृद्धी करण्याऐवजी कंपनीने कारमधील एक महत्वाचे फीचर कमी केले आहे. टाटाने आपल्या मिनी एसयूव्ही पंचमधून आयडल स्टार्टअप फीचर हटवले आहे. या फीचरला आयएसएसच्या नावाने देखिल ओळखले जाते. हे फीचर कमी केल्याने ग्राहकांना कोणते नुकसान होणार आहे. याबाबत जाणून घेऊया.
फीचर करत होते हे काम
वाहन ठराविक काळापेक्षा अधिक काळ एका ठिकाणी उभे राहिल्यावर हे फीचर कारचे इंजिन बंद करत होते. यामुळे इंधनाची बचत होत होती आणि कारपासून चांगले मायलेज मिळत होते. मात्र, हे फीचर काढून टाकल्यानंतर इंधनाची बचत होण्याची शक्यता कमी आहे.
(फ्युचरिस्टिक दिसते OLA ELECTRIC CAR, टिजरमध्ये पाहा आतील फीचर्स, इतकी असणार रेंज)
मिळालेल्या माहितीनुसार, आयडल स्टार्टअप फीचर केवळ बेस व्हेरिएंट टाटा पंच प्युअरमधून हटवण्यात आले आहे. हे फीचर वगळता होते ते फीचर तसेच ठेवण्यात आले आहेत. तसेच, कंपनी पंचच्या बेस व्हेरिएंटमध्ये स्टेयरिंग व्हील जवळ केवळ इको मोडचे बटन देणार. अपडेट पूर्वी येथे स्टार्ट/स्टॉप स्विच मिळत होते. अपडेट नंतर हे स्विच हटवण्यात आले आहे. कारमध्ये पुढील भागातील पावर विंडो, मॅन्युअल एसी, ओआरव्हीएमवरील टर्न इंडिकेटर, इको मोड, ड्युअल एयरबॅग, एबीएस आणि ईबीडी हे फीचर्स कायम असणार आहेत.
पंचला सुरक्षेच्या बाबतीत ५ स्टार
टाटा पंच आकाराने छोटी असली तरी सुरक्षेच्या बाबतीत ती कॉम्पॅक्ट एसयूव्हीला आव्हान देते. क्रॅश टेस्टनंतर ग्लोबल एनसीएपीकडून या मिनी एसयूव्हीला प्रौढांच्या सुरक्षेच्या बाबतीत पूर्ण ५ स्टार आणि मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत ४ स्टार मिळाले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये पंचच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती समोर आली होती. विक्रीच्या बाबतीत सप्टेंबर महिना टाटासाठी चांगला ठरला. दरम्यान पंचमधून आयडल स्टार्टअप फीचर हटवल्यानंतरही ग्राहक या वाहनाला पसंती देतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.