टाटा मोटर्स भारतातील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे. टाटाच्या नव्या गाडयांच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेण्यास ग्राहक उत्सुक असतात. त्यातच आता टाटा सफारीचे दोन नवे व्हेरीएंट लाँच करण्यात आले आहेत. या नव्या व्हेरीएंटमध्ये काय वेगळेपण आहे? आणि यांची किंमत किती आहे जाणून घेऊया.
टाटा सफारी एक्सएमएस (XMS) आणि एक्सएमएएस (XMAS) चे दोन नवीन व्हेरीएंट लाँच केले आहेत. या व्हेरीएंटची किंमत अनुक्रमे १७.९६ लाख रुपये आणि १९.२६ लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) आहे. हे मॉडेल एक्सएम आणि एक्सटी व्हेरीएंटमधील आहे. टाटा सफारी एक्सएमएएस आणि एसएमएस व्हेरियंटमध्ये पॅनोरामिक सनरूफ, ड्राइव्ह मॉडेल्स (इको, सिटी आणि स्पोर्ट), ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह सात इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, चार स्पीकर आणि चार ट्वीटर, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा हे फीचर्स उपलब्ध आहेत. सेन्सिंग वायपर, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो हेडलॅम्प आणि इलेक्ट्रिकली फोल्डेबल ORVMS सारखे एक्सट्रा फीचर्स उपलब्ध आहेत.
आणखी वाचा : ‘या’ आहेत सुझुकीच्या लोकप्रिय बाईक्स व स्कूटर; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स
टाटा सफारीच्या या प्रकारांमध्ये २.० लीटर Kryotec डिझेल इंजिन देखील आहे जे १६८nhp आणि ३५०Nm टॉर्क जनरेट करते. हे सहा-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, टाटा मोटर्सने हॅरियर एक्सएमएस व्हेरिएंट १७.२० लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीमध्ये लाँच केले होते.
हॅरियर व्हेरियंटच्या या प्रकारात २.० लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन उपलब्ध आहे, जे १७०hp आणि ३५०Nm टॉर्क जनरेट करते. एक्सएमएस व्हेरियंटला सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो, तर एक्सएमएएस व्हेरिएंटला सहा-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.
आणखी वाचा : कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांनी सीटबेल्ट लावला नाही तर वाजणार अलार्म; केंद्र सरकार आणणार नवा नियम
नवीन हॅरियरला स्टॅंडर्ड पॅनोरामिक सनरूफ देण्यात आले आहे. जे पूर्वी फक्त XT+, XTA+, XZ, XZA+, XZS आणि XZAS प्रकारांमध्ये उपलब्ध होते. याशिवाय, एक्सएमएस आणि एक्सएमएएस मॉडेल्समध्ये ऑटोमॅटिक हेडलँप, अँड्रॉइड ऑटो आणि ॲप्पल कारप्ले कनेक्टिव्हिटी, आठ-स्पीकर सिस्टम, रेन-सेन्सिंग वायपर्स, टच-स्क्रीन इन्फोटेनमेंट, इलेक्ट्रिकली फोल्डेबल रीअरव्ह्यू मिरर आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा हे फिचर्स उपलब्ध आहेत.