टाटा ही देशातील लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी असून लोक तिच्या नवीन मॉडेल्सच्या लाँचची आतुरतेने वाट बघत असतात. टाटा आपल्या अनेक बहुचर्चित कार्सचे इलेक्ट्रिक वेरिएंट मध्ये अपडेट करण्यास सुरुवात करत आहेत. लवकरच टाटाची ‘टाटा सफारी’ ही इलेक्ट्रिक कार सादर होणार आहे. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Tata इलेक्ट्रिक सफारी

टाटा सफारी इलेक्ट्रिक कारसह भविष्यात अधिकाधिक इलेक्ट्रिक कार सादर करण्याच्या योजनेवर टाटा काम करत आहे. सफारीला देशात खूप पसंती दिली जाते. सफारी मुख्यतः Tata Harrier SUV चा 7-सीटर प्रकार आहे. टाटा कंपनीच्या भविष्यातील प्लॅनमध्ये त्यांच्या कारमध्ये ४WD फीचर वापरण्यात येणार आहे.

आणखी वाचा : सणासुदीच्या काळात पुन्हा महागली Toyota Fortuner; जाणून घ्या नवी किंमत…

Tata’s इलेक्ट्रिक सेगमेंट

येणाऱ्या पुढील तीन वर्षात टाटा आपल्या इलेक्ट्रिक कारवर मोठी गुंतवणूक करणार आहे. येत्या काळात कंपनी नवीन दहा इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याच्या विचारात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला टाटा ने Curvv आणि Avinya संकल्पना प्रदर्शित केल्या होत्या. टाटा सध्या नेक्सन कॉम्पॅक्ट SUV मॉडल्स च्या फोर-व्हील ड्राईव्ह (FWD) सिस्टीमवर काम करत आहे. या ऑप्शनसह हॅरिअर आणि सफारी कार ऑफरोड सारख्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देण्यास सक्षम होतील.

Tata’s इलेक्ट्रिक कार किंमत

टाटा मोटर्स ने नुकतीच लॉंच केलेली इलेक्ट्रिक कार ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. टाटा ने ही कार XE, XT, XZ+ आणि XZ+Tech Lux या चार प्रकारांमध्ये लाँच केली होती. ज्यांची किंमत ८.४९ लाख ते ११.७९ लाख रुपये एवढी होती. १० ऑक्टोबरपासून या कारचे बुकिंग करता येईल, अशी घोषणा टाटा ने केली आहे.