Tata Safari Stealth Edition launched: टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात भारत मोबिलिटी एक्स्पो २०२५ मध्ये सफारी स्टील्थ एडिशनचे अनावरण केले. या कार निर्मात्याने आता सफारीचे हे स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहे, जे कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केले आहे. अ‍ॅकम्प्लिश्ड+ ट्रिमवर आधारित, सफारी स्टील्थ एडिशनची किंमत २५.३० लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. यामुळे ही कार टॉप-स्पेसिफिकेशन सफारी डार्क एडिशन अकम्प्लिश्ड+ ट्रिमच्या बरोबरीची आहे.

Tata Safari Stealth Edition variantsEx-showroom price
Accomplished+ MTRs 25.30 lakh
Accomplished+ ATRs 26.90 lakh
Accomplished+ AT 6-seaterRs 27.00 lakh

टाटा सफारी स्टील्थ एडिशन: इंटेरियर आणि एक्सटेरियर

सफारी स्टील्थ एडिशनचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मॅट ब्लॅक एक्सटीरियर, जो एसयूव्हीला स्टॅंडर्ड मॉडेलच्या तुलनेत अधिक प्रभावी लूक देतो. या लूकला पूरक म्हणून, अलॉय व्हील्सना डार्क फिनिश देण्यात आली आहे, तर पॅकेजचा पार्ट म्हणून पुढील फेंडर्सना स्टील्थ बॅजिंग देण्यात आली आहे. ही पूर्णपणे काळ्या रंगाची थीम केबिनपर्यंत पसरलेली आहे, एस्थेटिक्स आणि अनुभव दोन्ही बाबतीत डार्क एडिशन रेंजशी अगदी साम्य आहे.

आत, कार्बन नॉयर-थीम असलेला डॅशबोर्ड सॉफ्ट-टच मटेरियल आणि लेदर असलेला आहे, जो त्याचे प्रीमियम आकर्षण वाढवतो. कलर स्किम व्यतिरिक्त सफारी अकम्प्लिश्ड+ व्हेरिएंटमधील केबिन लेआउटमध्ये कोणताही बदल झालेला नाही, ज्यामध्ये १२.३-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि चार-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील समाविष्ट आहे.

टाटा सफारी स्टील्थ एडिशन : फीचर्स

सोयीसुविधांच्या बाबतीत सफारी स्टील्थ एडिशनमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेद्वारे वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, व्हॉइस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ, अलेक्सा व्हॉइस कमांड, मॅप माय इंडियावरून इन-बिल्ट नेव्हिगेशन, पॉवर्ड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, जेश्चर-नियंत्रित पॉवर्ड टेलगेट, व्हॉइस असिस्टेड ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल इत्यादी फीचर्सचा समावेश आहे.

सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि लेव्हल २ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमद्वारे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.

टाटा सफारी स्टील्थ एडिशन : पॉवरट्रेन स्पेसिफिकेशन

यांत्रिकदृष्ट्या, सफारी स्टील्थ एडिशन स्टॅंडर्ड मॉडेलसारखेच आहे. ते त्याच २.०-लिटर क्रियोटेक डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे १६८ बीएचपी आणि ३५० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिटसह असू शकते.

Story img Loader