Tata Safari Dark Edition :  हॅरियर आणि नेक्सॉन नंतर टाटा मोटर्सने आपल्या सेवन सीटर एसयूव्ही टाटा सफारीची ऑल ब्लॅक डार्क एडिशन देखील लॉंच केली आहे. या एसयूव्हीमध्ये कंपनीने सामान्य सफारीच्या तुलनेत अनेक फीचर्स अपडेट केले आहेत. उदाहरणार्थ, Dork Edition Safari ला मोठ्या टेल गेटसह ब्लॅकस्टोन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, जे या SUV चे एक्सटीरियर पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनवले आहेत. जाणून घेऊयात या नव्या डार्क एडिशन Tata Safari ची किंमत, इंजिन आणि फिचर्सबाबत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डार्क एडिशनमध्ये मिळणार ग्लॉसी ब्लॅक फिनिश
टाटा सफारीच्या डॉर्क एडिशनमध्ये टाटा मोटर्सचा लोगो क्रोम फिनिशमध्ये आहे. बाकी SUV कलर ओबेरॉय ब्लॅकमध्ये आहे. एसयूव्हीच्या हेडलॅम्पच्या साइड्स, फ्रंट ग्रिल वर क्रोम फिनिश, ब्लॅक स्टोन अलॉय व्हील देण्यात आलं आहे. नवीन सफारीचा हा लूक खूपच आकर्षक दिसतो.

सफारी डार्क एडिशनची किंमत
टाटा मोटर्सने नवीन सफारी डार्क एडिशनची दिल्ली एक्स-शोरूम किंमत १९ लाख ५ हजार रुपये ठेवली आहे. या SUV मध्ये, तुम्हाला १८ इंचाच्या ब्लॅक स्टोन अलॉय व्हीलसह एक चांगला टेलगेट मिळेल. Tata Safari ची डार्क एडिशन XT+, XTA+, XZ+ आणि XZA+ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.

सफारी डॉर्क एडिशनची खास फिचर्स
टाटा मोटर्सनुसार, नवीन सफारी डॉर्क एडिशनमध्ये तुम्हाला हवेशीर पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील सीट मिळतील. यासोबतच एअर प्युरिफायर, अँड्रॉइड ऑटो आणि वायफायसह कार प्ले या एसयूव्हीमध्ये उपलब्ध असतील.

सफारी डार्क एडिशनचे इंजिन
टाटा मोटर्सने नवीन डार्क एडिशन एसयूव्हीमध्ये २.० लिटर क्रिओटेक डिझेल इंजिन दिले आहे, जे १७० bhp कमाल पॉवर आणि ३५० Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर या SUV मध्ये तुम्हाला ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल.

सफारी डार्क एडिशनशी स्पर्धा
टाटा सफारीची डॉर्क एडिशन एमजी हेक्टर, किया क्रेन, टोयोटा फॉर्च्युनर यांसारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata safari suv dark edition launched know how it is different from the previous model and which vehicles compete prp