टाटा मोटर्स पुढील पाच वर्षांत १० इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. कंपनी या सेगमेंटमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नेक्सनच्या यशानंतर कंपनी इलेक्ट्रिक गाड्यांवर लक्ष केंद्रीत करत आहे. तसेच कंपनी नेक्सनचं अधिक शक्तिशाली वर्जन आणण्याच्या तयारीत आहे. आता कंपनी आयकॉनिक सिएरा (टाटा सिएरा) देखील नवीन अवतारात आणत आहे. हे कंपनीचे पहिले मॉडेल असेल जे ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. भारतात बनवलेली पहिली स्वदेशी एसयूव्ही पुन्हा एकदा बाजारात कमबॅक करणार आहे. टाटा मोटर्सने प्रथम १९९१ मध्ये लॉन्च केली होती. आता नवीन युगातील इलेक्ट्रिक वाहन म्हणून रस्त्यावर धावताना दिसणार आहे.
ऑटो एक्स्पो २०२० मध्ये, कंपनीने ते एक संकल्पना वाहन म्हणून सादर केले. टाटा मोटर्सची ही पहिली कार असेल जी फक्त इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये येईल, म्हणजेच ती कंपनीची इलेक्ट्रिक कार असेल. त्याचं पेट्रोल किंवा डिझेल वर्जन येणार नाही. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सिग्मा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. टाटा सिएरा या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. सध्या कंपनीचे Nexon EV आणि Tigor EV फक्त त्यांच्या पेट्रोल इंजिन प्लॅटफॉर्मवर तयार केले आहेत. नवीन सिएराला नवीन डोअर कॉम्बिनेशन मिळण्याची अपेक्षा आहे, तर जुन्या टाटा सिएराला तीन दरवाजे होते.
Video: सरड्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात रंग बदलते BMW ची इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या
टाटा सिएरा भारतीय बाजारपेठेत कधी उतरणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण २०२५ पर्यंत पूर्णपणे बाजारात येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, टाटा मोटर्स लवकरच आपल्या कारचे सीएनजी मॉडेल लॉन्च करणार आहे. Tiago CNG आणि Tigor CNG दोन्ही १९ जानेवारीला लॉन्च होणार आहेत.