कार बाजारात टाटाच्या वाहनांनी धुमाकूळ घातले आहे. टाटा नेक्सॉन या एसयूव्हीला प्रचंड मागणी आहे. कंपनी इलेक्ट्रिक सेंगमेंटमध्ये शिरली असून एमजी आणि इतर इलेक्ट्रिक कार निर्मात्यांना ती आव्हान देऊ पाहात आहे. दरम्यान टाटाची देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV २८ सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. मात्र लाँच पूर्वीच या कारचे काही फीचर उघड होत आहे ज्याने ग्राहकांची उत्सुक्त शिगेला पोहोचली आहे.
फास्ट चार्जिंगची सुविधा मिळणार
टाटा टिआगो ईव्ही २८ मध्ये वन पेडल ड्राइव्ह फीचर मिळणार आहे. तसेच ही कार फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला देखील सपोर्ट करणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कारमध्ये २६ किलोवॉट हवर लिथियम आयन बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. टिगोर ईव्हीला डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने एका तासांत ८० टक्के चार्ज केले जाऊ शकते. टिआगो ईव्हीची किंमत १० लाखांपेक्षाही कमी असण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
वन पेडल ड्राईव्ह मिळणार
टाटा टियागो ईव्ही ही कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह येईल. कारमध्ये झेड कनेक्ट तंत्रज्ञान मिळेल. स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी देखील मिळेल, तसेच कार प्रिमियम लेदर सीटसह येईल. कारमध्ये वन पेडल ड्राइव्ह फीचर मिळेल. हे फीचर शक्तीशाली रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग सुविधेचा वापर करते. यामध्ये अॅसिलेटरचा वापर स्पिड वाढवणे तसेच ब्रेक लावण्यासाठी होतो. अॅसिलरेटर वाढवल्यास स्पिड वाढते आणि तो कमी केल्यास कारचा ब्रेक लागतो. याने बॅटरी देखील चार्ज होते.
३१० किंमी रेंज मिळण्याची शक्यता
टियागो ईव्ही २६ किलोवॉट हवरची बॅटरी आणि एका इलेक्ट्रिक मोटरसह येण्याची शक्यता आहे. ही मोटर ७४ बीएचपीची पावर आणि १७० एनएमचा टॉर्क निर्माण करण्यात सक्षम आहे. कार ३१० किंमीची रेंज देण्याची शक्यता आहे. टियागो ईव्ही नंतर टाटा अल्ट्रोजचेही ईव्ही मॉडल लाँच करण्याची शक्यता आहे.
प्रथम २०१८ साली प्रदर्शित
Tata Tiago EV प्रथम ऑटो एक्सपो 2018 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. ही कार २०२० पर्यंत भारतीय बाजारपेठेत लाँच होण्याची अपेक्षा होती, परंतु कंपनीने त्याचे लाँच पुढे ढकलले. टाटा नेक्सॉन ईव्ही, नेक्सॉन मॅक्स ईव्ही आणि टिगोर ईव्ही भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले. आता Tiago EV देखील लाँच होणार आहे.