आयपीएलच्या 16व्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. IPL २०२३ आज (३१ मार्च) पासून सुरु होणार आहे. या आयपीलचे Tata हे टायटल स्पॉन्सर आहेत. यावेळी टाटा मोटर्सची Tiago EV कंपनीकडून अधिकृत भागीदार म्हणून या लीगमध्ये सहभागी होत आहे. IPl मध्ये पहिला सामना चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे.

या पार्टनरशिपबद्दल बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे (Marketing, Sales and Service Strategy) प्रमुख विवेक श्रीवत्स म्हणाले , सलग ५ यशस्वी सीझननंतर आम्ही Tata IPL सह आमची सर्वात नवीन EV , आमची प्रीमियम इलेट्रीक हॅचबॅक Tiago EV सादर करत आहोत. या नवीन उत्पादनासह, भारतातील प्रत्येक भागात EV कार नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

हेही वाचा : मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून Hero Motocorp च्या CEO पदाची धुरा आता निरंजन गुप्ता यांच्या हाती; तब्बल २५ वर्षांचा आहे अनुभव

अधिकृत भागीदार म्हणून, कंपनी टाटा IPL प्लॅटफॉर्म वापरून सर्व १२ स्टेडियममध्ये नवीन Tiago EV प्रदर्शित करेल. यासोबतच ही कार खरेदी करण्याच्या १०० कारणांचा प्रचार कंपनी करणार आहे. आयपीलमध्ये कंपनीच्या या अभियानाची सुरुवात होणार आहे.

टाटा टिआगो EV (image credit – financial express)

या हंगामातील सर्व सामने Tiago EV इलेक्ट्रिक स्ट्रायकर अवॉर्डसाठी देखील खेळले जातील. ज्यामध्ये मॅचमध्ये सार्वधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूला १,००,०० रुपये रोख असे बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार आहे. संपूर्ण हंगामात सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूला Tiago EV बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 30 March: ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

टाटा मोटर्स हे २०१८ पासून आयपीएलशी संबंधित आहे. या सीझनमध्ये Nexon, Harrier, Altroz ​​आणि Punch या कार्स सादर केल्या. या वर्षीच्या सीझनमध्ये Tiago EV सादर करणे म्हणजे देशातील हरित ऊर्जा प्रकल्पाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.