टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वी सर्वात स्वस्त बॅटरी असलेली कार Tiago EV सादर केली होती. १० ऑक्टोबरपासून टाटा टियागो ईव्हीची देशात बुकिंग सुरु झाली आहे. ग्राहकांनी या देशातल्या सर्वात स्वस्त कारला भरभरून प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी या कारचे १० हजारांहून अधिक बुकिंग झाले आहेत.
टाटा टियागो ईव्ही सात प्रकारांमध्ये उपलब्ध आहे ज्याची किंमत ११.७९ लाख रुपये आहे. ही किंमत टाटा टियागो ईव्हीच्या पहिल्या १०,००० युनिट्ससाठी आहेत. या कारला मागच्या महिन्यात सादर करण्यात आले. तेव्हा टाटा मोटर्सने सांगितले होते की, Tata Tiago EV चे बुकिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. आता त्याची बुकिंग १० ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाले असून नवीन Tata Tiago EV कार फक्त २१,००० रुपयांना बुक करता येईल. टियागो ईव्हीची डिलिव्हरी जानेवारी २०२३ पासून सुरु होईल. परंतु कोणतीही ठराविक तारीख कंपनीने सांगितलेली नाही.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, “Tiago.ev ला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आनंद झाला आहे. हे लक्षात घेऊन आम्ही पुढील १० हजार ग्राहकांसाठी इंट्रोडक्ट्री प्राइस तशीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा :Tata Tiago EV ची बुकिंग आज १० ऑक्टोबर २०२२ पासून सुरू; जाणून घ्या प्रक्रिया
टाटा टियागो ईव्हीची वैशिष्ट्ये
टियागो ईव्ही ही कार कंपनीने ही इन-हाउस हाय व्होल्टेज आर्किटेक्चरवर विकसित केली आहे. तसेच ही कार वेगवेगळ्या गरजा लक्षात घेता IP६७ रेटेड बॅटरी पॅक आणि २४kWh बॅटरी पॅकसह अनेक वेगवेगळ्या चार्जिंग ऑप्शन्ससह येते. हे बॅटरी पॅक याच्या XT, XZ +, XZ + Tech LUX, प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही कार ३१५ किमीपर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे.
टाटा टियागो ईव्ही बजेट सेगमेंटमध्ये भारतातली पहिली हॅचबॅक प्रीमियम इलेक्ट्रिक कार बनली आहे. या कारमध्ये कंपनीने ४ चार्जिंग ऑप्शन्स दिले आहेत. यामध्ये १५A सॉकेट, ३.२ kw AC चार्जर, ७.२ kw AC चार्जर आणि DC फास्ट चार्जर ऑप्शनचा समावेश आहे.