Tata Electric Car Price Hike: टाटा मोटोर्सची नुकतीच देशात ‘Tata Tiago’ इलेक्ट्रिक कार भारतात लाँच झाली आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (cheapest electric car) आहे. या कारची प्रतीक्षा अनेक ग्राहक करत होते. परंतु आता Tata Tiago या लोकप्रिय कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वाईट बातमी आहे. कंपनीने या कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Tiago EV किंमत

टाटा मोटर्सने अलिकडेच देशातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्ही अवघ्या ८.४९ लाख रुपये इतक्या किंमतीसह सादर केली आहे. परंतु आता कंपनी किमती वाढणाक आहे.  

किती होणार वाढ?

बॅटरीसह साहित्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता, ऑटोमेकरने भारतातील सर्वात स्वस्त ईव्हीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Tata Motors जानेवारी २०२३ पासून Tiago EV च्या किमती चार टक्क्यांनी वाढवणार आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी ही माहिती दिली आहे. २०,००० पेक्षा जास्त बुकिंग असलेल्या नवीन ग्राहकांसाठी ही दरवाढ लागू होईल.

(हे ही वाचा : Top 5 Low Budget Electric Scooters: देशातील सर्वात स्वस्त ‘या’ पाच इलेक्ट्रिक स्कूटर्स; किंमत 45,000 पासून सुरु )

Tata Tiago EV वैशिष्ट्ये

Tata Tiago EV कारमध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर ७४ BHP ची पॉवर आणि १७० NM टॉर्क जनरेट करते. जे २६kWh च्या बॅटरीक पॅकसह जोडण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये ३१० किमीची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने ही कार फक्त एक तासात ० ते ८० टक्के चार्ज होते.

कंपनीने यात Z Connect सह स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टीपल ड्राइव्ह मोड, फॉग लॅम्प, मल्टी-मोड रीजन फंक्शन, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहे.