Electric Car Delivery: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत असून टाटा मोटर्स त्यात आघाडीवर आहे. टाटा मोटर्सकडे नेक्सॉन, टिगोर आणि टियागो सारख्या अनेक इलेक्ट्रिक कार आहेत. गेल्या वर्षी टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लाँच केली होती, जी ग्राहकांना खूप आवडते. लाँच झाल्यापासून चार महिन्यांत, इलेक्ट्रिक हॅचबॅकची १०,००० वाहने वितरित केली गेली आहेत. कंपनीने दावा केला आहे की, लाँच झाल्यानंतर चार महिन्यांत ही कामगिरी करणारी ही सर्वात वेगवान ईव्ही बनली आहे. पहिल्या २४ तासांत १०,००० बुकिंग झाले आणि डिसेंबर २०२२ पर्यंत २०,००० बुकिंग झाले. एका महिन्याच्या आत २० हजार लोकांनी या कारला बुक केले होते. टाटा टियागो ईव्ही भारतीय बाजारातील ‘Fastest Booked EV’ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॅटरी पॅक आणि रेंज

Tata Tiago EV १९.२kWh आणि २४kWh मध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत जे IP६७ रेट केलेले आहेत. २४kWh बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यावर ३१५ किमीची रेंज देतो. याला स्पोर्ट्स ड्राइव्ह मोड देखील मिळतो, जो ५.७ सेकंदात ० ते ६०Kmph पर्यंत वेग वाढवू देतो. कंपनी बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटरसाठी ८ वर्षे / १,६०,००० किमी वॉरंटी देखील देते.

(हे ही वाचा : Ola S1, Chetak अन् Ather चे उडाले होश, देशात दाखल झाली, मुंबई ते पुणे सिंगल चार्जमध्ये गाठणारी ई-स्कूटर, किंमत… )

चार्जिंग वेळ

Tiago EV मध्ये ४ चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत. ७.२ किलोवॅट चार्जरने ३.६ तासांत पूर्ण चार्ज करता येईल. हे १५A पोर्टेबल चार्जरसह ८.७ तासांमध्ये १० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. दुसरीकडे, डीसी फास्ट चार्जरद्वारे ते केवळ ५८ मिनिटांत १० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज केले जाऊ शकते.

Tata Tiago EV मध्ये ग्राहकांना बरीच वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यात पूर्णपणे स्वयंचलित हवामान नियंत्रण, प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रूझ कंट्रोल, ऑटो फोल्डसह इलेक्ट्रिक ORVM, ऑटो हेडलॅम्प आणि रेन सेन्सिंग वायपर यांचा समावेश आहे.

किंमत

या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत ८.६९ लाख रुपयांपासून सुरू होते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata tiago ev was also the fastest booked ev in india receiving 10000 bookings in just 24 hours and 20000 bookings by december 2022 pdb