Tata Tiago Records Over 6 Lakh Units Sold :जेव्हा जेव्हा बजेट कारचा विचार केला जातो तेव्हा लोकांच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे मारुती कार. मारुती कार त्यांच्या इंधन कार्यक्षम आणि कमी maintance इंजिनसाठी ओळखल्या जातात. कंपनी पाच ते सहा लाख रुपयांच्या किमतीच्या सेगमेंटमध्ये आपले अनेक मॉडेल्स ऑफर करते. मारुतीच्या स्वस्त गाड्यांशी स्पर्धा करण्यात टाटा मोटर्स आघाडीवर आहे, जी मारुती अल्टो, एस-प्रेसो, सेलेरियो आणि वॅगनआरसारख्या कारच्या तुलनेत आपल्या टियागो हॅचबॅकची विक्री करत आहे. टाटा टियागो केवळ किमतीतच नाही तर सेफ्टीच्या दृष्टीनेही इतर अनेक बजेट कारपेक्षा सरस आहे. अशातच टाटा टियागो कारने विक्रीमध्ये एका नवा रेकॉर्ड केला आहे. फक्त ४.९९ लाखांच्या कारच्या सहा लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.
कंपनीने एप्रिल २०१६ मध्ये पहिल्यांदा कारला घरगुती मार्केटमध्ये लाँच केलं होतं आणि आता ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सरासरी मासिक विक्री ४,५४६ युनिट्ससह, उर्वरित युनिट्स नोव्हेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात विकल्या जाण्याची शक्यता आहे. आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कारपैकी ही एक आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला चार स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती.
टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कार पोर्टफोलिओमध्ये टाटा टियागो ही कार अव्वल कामगिरी करणारी आहे. टाटा टियागोची सर्वाधिक ९२,३६९ युनिट्सची विक्री २०१९ मध्ये झाली, जी टाटा मोटर्सच्या एकूण प्रवासी कार विक्रीच्या ७१% आहे. दरम्यान, करोनामुळे २०१९ नंतर काही वर्षांत विक्रीत घट झाली, तर पुन्हा २०२३ मध्ये विक्रीत ३३ टक्क्यांची वाढ होऊन ती ७७,३९९ युनिट्स झाली. त्यानंतर २०२४ मध्ये याची मागणी वाढतच गेली आणि ती ८५,४७८ युनिट्सपर्यंत पोहोचली. मागणीत चढ-उतार असूनही टाटा मोटर्सच्या प्रवासी कार विक्रीतील टियागोचा वाटा लक्षणीय राहिला आहे. सरासरीनुसार, कंपनी प्रत्येक महिन्याला ४५,००० युनिट्सची विक्री करते.
हेही वाचा >>Audi New Logo: आधी जग्वार आणि आता Audi ने बदलला आपला चार बांगड्यांचा लोगो; कारण काय?
कंपनीच्या मते ही कार खरेदीदारांचे सरासरी वय ३५ वर्षे आहे. यामध्ये ६०% विक्री शहरी बाजारातून आणि ४०% ग्रामीण भागातून झाली आहे. टियागो कारच्या एकूण विक्रीपैकी सुमारे १०% महिला खरेदीदार आहेत. या इंजिनमध्ये पाच स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. या कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजी आहे. याचं पेट्रोल व्हेरियंट १६ किमी/लिटर आणि सीएनजी व्हेरियंट २६ किमी/किग्रॅ मायलेज देतं.