Tata Cheapest Car: टाटा मोटर्सच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या कारच्या जोरदार विक्रीमुळे, टाटा मोटर्स सध्या देशातील तिसरी सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. कंपनीच्या Tata Nexon SUV ला ग्राहकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. यामुळे ती टाटाची सर्वाधिक विक्री होणारी कार राहिली आहे. यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्सची पंच मायक्रो एसयूव्ही आहे, जी पहिल्या दहामध्ये कायम आहे. दरम्यान, कंपनीची आणखी एक कार आहे ज्याने अचानक विक्रीत मोठी उडी दाखवली आहे. या कारच्या विक्रीत ८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टाटाची सर्वात स्वस्त कार
टाटा टियागो हॅचबॅक आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे ज्याची किंमत सुमारे ५.५ लाख रुपयांपासून सुरू होते. मार्च महिन्यात टाटा मोटर्सची ती तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या महिन्यात ७३६६ युनिटची विक्री झाली होती. तर एक वर्षापूर्वी म्हणजेच मार्च २०२२ मध्ये टियागोच्या फक्त ४००२ युनिट्सची विक्री झाली होती. अशा प्रकारे, टियागोच्या विक्रीत वार्षिक ८४ टक्क्यांची वाढ झाली.
(हे ही वाचा : रतन टाटा तुमचे स्वप्न करणार पूर्ण! ‘या’ लोकप्रिय सुरक्षित कार स्वस्तात खरेदी करण्याची देताहेत संधी, ‘असा’ मिळवा लाभ )
किंमत
Tata Tiago मुख्यत्वे XE, XM, XT(O), XT, XZ आणि XZ+ या सहा प्रकारांमध्ये विकली जाते. त्याची किंमत ५.५४ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ८.०५ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते. तुम्ही टियागो पाच रंगांमध्ये खरेदी करू शकता, मिडनाईट प्लम, डेटोना ग्रे, ओपल व्हाइट, ऍरिझोना ब्लू आणि फ्लेम रेड. याला २४२ लीटरची बूट स्पेस मिळते. त्याची थेट स्पर्धा मारुती सुझुकी सेलेरियो, वॅगन आर आणि सिट्रोएन सी३शी आहे.
इंजिन आणि ट्रान्समिशन
या कॉम्पॅक्ट हॅचबॅकला १.२-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे ८६PS पॉवर आणि ११३Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्याय आहेत. हे इंजिन सीएनजी मोडमध्ये ७३PS आणि ९५Nm निर्मिती करते आणि केवळ पाच-स्पीड मॅन्युअलमध्ये येते.
(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे उडाले होश, देशात दाखल झाली ५५ हजाराची E-scooter, बुकिंगही सुरू, बॅटरी स्वॅप करुन पळवा नाॅनस्टाॅप)
मायलेज
पेट्रोल MT: १९.०१ kmpl
पेट्रोल AMT: १९ kmpl
CNG: २६.४९ किमी/किलो
NRG MT/AMT: २०.०९ kmpl
वैशिष्ट्ये
टाटा कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, LED DRL सह प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि वायपरसह मागील डिफॉगर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. यात ८-स्पीकर साउंड सिस्टीम, स्वयंचलित हवामान नियंत्रण आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स देखील मिळतो.