भारतीय कार बाजारात टाटा मोटर्स सर्वात विश्वसनीय आणि प्रसिद्ध कार निर्माता कंपनी आहे. स्वदेशी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपले नवनवीन वाहन देशात सादर करत असते. आता कंपनी टियोगाचा एनआरजी प्रकार देखील लवकरच लाँच करणार आहे. जो टॉप-स्पेक XZ आणि XT ट्रिममध्ये येतो. या कारच्या किमतीची घोषणा नोव्हेंबर २०२२ च्या सुरुवातीला होईल, असे कंपनीने सांगितले आहे. Motor Arena ने यासंबंधीचे अपडेट शेअर केले आहे.
टाटा टियागो एनआरजी सीएनजी
टाटा मोटर्सने खुलासा केला की, टियोगाचा एनआरजी त्याच्या स्टाइल आणि डिझाइनमुळे ग्राहकांना आवडते. टाटा टियागो NRG iCNG साठी समान किंमत प्रीमियम असण्याची शक्यता आहे कारण, ही कार मूलत: उंच सस्पेंशन, बुच स्टाइल आणि उच्च ग्राउंड क्लीयरन्स असलेली टियागो आहे.
वाढत्या सीएनजी सेगमेंटमध्ये आमची उपस्थिती आणि व्हॉल्यूम वाढवण्यासाठी, आम्ही Tiago NRG iCNG भारतातील पहिले Toughroader CNG लाँच करत आहोत, टाटा मोटर्सने सांगितले आहे.
आणखी वाचा : मेड इन इंडिया Electric Car २५ नोव्हेंबरला लाँच होणार; सिंगल चार्जमध्ये मिळेल 500 किमी रेंज!
टाटा टियागो एनआरजी सीएनजीचे इंजिन
टाटा टियागो एनआरजी सीएनजी आता डीलरशिपवर बिलिंगसाठी उपलब्ध आहे. Tiago NRG मध्ये CNG १.२-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल जे CNG वर चालते तेव्हा ७२ Bhp आणि ९५ एनएम टॉर्क निर्माण करेल. त्याचे मायलेज २६.४ किमी असेल. कंपनीच्या किमतीची अधिकृत घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते. हे ग्रे, व्हाईट, रेड आणि फॉलीएज ग्रीन कलरमध्ये लॉन्च केले जाईल.
Tiago NRG CNG किंमत
सध्याच्या Tiago NRG XT ची किंमत ६.४२ लाख रुपये आणि XZ ची किंमत ६.८३ लाख रुपये आहे. नियमित टियोगाच्या सीएनजी प्रकाराची किंमत त्यांच्या पेट्रोल समकक्षांपेक्षा ९१k अधिक आहे.
Tiago NRG CNG ची किंमत समान ठेवण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. तसे असल्यास, Tiago NRG XT CNG ची एक्स-शोरूम किंमत ७.३३ लाख रुपये आणि NRG XZ CNG ची किंमत ७.७४ लाख रुपये असू शकते.