कार क्षेत्रात अलीकडच्या काळात सीएनजी गाड्यांना भरपूर मागणी मिळत आहे, याचं कारण म्हणजे पेट्रोलची किंमत आणि सतत वाढत जाणारे प्रदूषण होय. लोकांचा हा बदलता ट्रेंड लक्षात घेऊन कार निर्मात्यांनी त्यांच्या सध्याच्या कारचे सीएनजी मॉडेल लाँच करण्याबरोबरच नवीन सीएनजी कार बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.

सध्या बाजारात असलेल्या सीएनजी कारपैकी आज आम्ही टाटा मोटर्सच्या लोकप्रिय हॅचबॅक, टाटा टियागोबद्दल बोलत आहोत, या कारला कमी किमतीव्यतिरिक्त त्याच्या स्टाइलिश डिझाइन आणि लांब मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?
Car sales around Diwali has fallen so low this year
Car Sales In Festive Season Low : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी गाड्यांकडे फिरवली पाठ; विक्री झाली १८ टक्क्यांनी कमी, नेमकं कारण काय?

Tata Tiago XE CNG व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ६,२९,९०० रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन रोड ७,०९,९३० रूपयांपर्यंत जाते. पण तुम्ही ही कार एका सोप्या फायनान्स प्लॅनसह खरेदी करू शकता ज्यामध्ये तुम्हाला एकाच वेळी ७ लाख रुपये खर्च करावे लागणार नाहीत.

आणखी वाचा : आकर्षक डिझाईन आणि जबरदस्त मायलेज देणारी Yamaha Fascino केवळ २३ हजारांमध्ये, जाणून घ्या ऑफर

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला हा टाटा टियागो एक्सई सीएनजी फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करायचा असेल, तर बँक यासाठी ६,३८,९३० रुपये कर्ज देईल.

हे कर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला किमान ७१,००० रुपये डाऊन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर दरमहा १३,५१३ रुपये मासिक EMI भरावे लागेल.

टाटा टियागोवरील या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या ५ वर्षांमध्ये बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.

आणखी वाचा : Hyundai Tucson प्री-बुकिंग सुरू, ४ ऑगस्टला होणार लाँच, जाणून घ्या सविस्तर माहिती

फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाऊन पेमेंट आणि ईएमआय प्लॅनचे तपशील वाचल्यानंतर, तुम्ही या कारच्या इंजिनपासून ते मायलेज आणि स्पेसिफिकेशनपर्यंतचे संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता.

Tata Tiago च्या इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात ११९९ cc चे इंजिन दिले आहे. हे इंजिन ७२ bhp पॉवर आणि ९५ Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की ही Tata Tiago XE CNG २६.४९ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.