ऑटो सेक्टरमध्ये पेट्रोल आणि डिझेल कार व्यतिरिक्त आता सीएनजी कारच्या मागणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. सीएनजी कारची मागणी पाहता मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत अनेक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या सीएनजी व्हर्जन लाँच करण्यास सुरुवात केली आहे.

सीएनजी कारच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे टाटा मोटर्सची हॅचबॅक टाटा टियागो सीएनजी जी त्याच्या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणली जाते. कमी किंमतीव्यतिरिक्त मायलेज आणि फीचर्समुळे तिला मोठी पसंती मिळते.

The new Jio Diwali offers are valid until 5 November 2024
Jio Diwali Dhamaka Offer : जिओच्या ‘या’ दोन रिचार्जवर मिळणार डिस्काउंट कूपन; ३,३५० रुपयांच्या फायद्यासाठी कूपन कसं मिळवायचं ते बघा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Thane Diwali Traffic congestion,
ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, खरेदीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी
Snack materials became expensive, Snack,
फराळाचे साहित्य महागले
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची संपत्ती सोडली, इच्छापत्रात श्वानाचीही केली सोय; नोकर, भाऊ-बहीण, शंतनू नायडूचाही उल्लेख
Diwali Discount On Aprilia Bike
Diwali Discount On Aprilia Bike : झिरो डाउन पेमेंट, तीन वर्षांची वॉरंटी आणि बरंच काही… दिवाळीत ही खास बाईक खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी
Diwali Festival Discounts Best time to buy TVS iQube
Diwali Festival Discounts: हीच आहे TVS iQube खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ, आताच करा बुक

Tata Tiago CNG ची एक्स-शोरूम किंमत ६,२९,९०० रूपये आहे जी ऑन-रोड असताना ७,१२,५९९ रूपये आहे. या कारची किंमत जाणून घेतल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी सुलभ फायनान्स प्लॅन जाणून घ्या…

Tata Tiago रोखीने खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७ लाख रुपयांची आवश्यकता असेल. परंतु फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही ७१ हजार रुपये खर्च करून ही कार घरी नेऊ शकता.

आणखी वाचा : TVS मोटर्सने Apache RTR 160 आणि Apache RTR 180 चे अपडेटेड वर्जन केले लॉंच, हाय-टेक फीचर्स मिळतील

ऑनलाइन उपलब्ध डाउन पेमेंट आणि EMI प्लॅननुसार, बँक Tata Tiago चे CNG व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी ६,४१,५५९ रुपये कर्ज देईल आणि बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.८ टक्के व्याजदर आकारेल.

कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून ७१ हजार रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर पुढील ६० महिन्यांसाठी दरमहा १३,५६८ रुपये मासिक ईएमआय द्यावा लागेल.

आणखी वाचा : केवळ ३० हजारांच्या बजेटमध्ये Honda Activa 6G घरी घेऊन जाऊ शकता

टाटा टियागो सीएनजी फायनान्स प्लॅनचे तपशील जाणून घेतल्यानंतर, तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि मायलेजचे संपूर्ण तपशील देखील जाणून घ्या.

Tata Tiago XE CNG mileage
ARAI ने प्रमाणित केलेल्या मायलेजनुसार, CNG किटसह Tata Tiago २६.४९ kmpl मायलेज देते.

Tata Tiago XE CNG Engine and Transmission
Tata Tiago मध्ये ११९९ cc चे इंजिन देण्यात आले आहे, ज्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन ७२ bhp पॉवर आणि ३५० Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Tiago XE CNG Features
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने यात मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम सारखे फीचर्स दिले आहेत.