पॅसेंजर गाडयांमध्ये टाटा मोटर्स ही भारतातील आघाडीची कंपनी आहे. भारतीय मार्केटमध्ये आणखी विस्तार करण्यासाठी कंपनी सध्याच्या गाड्यांचे नवीन व्हेरिएंट लाँच करत आहे. अलीकडेच कंपनीने टियागो एनआरजी एक्सटी हा व्हेरिएंट लाँच केला होता. याशिवाय आता टाटा टियागोचे ड्युअल टोन व्हर्जन लाँच करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंमत

टाटा मोटर्सच्या ‘टाटा टियागो एक्स टी रिदम’ (Tata Tiago XT Rhythm) ची किंमत ६.४५ लाख रुपये ठरवण्यात आली आहे. ही किंमत रेग्युलर एक्सटी (XT) प्रकारापेक्षा ४५,००० रुपये आणि एक्सझेड (XZ) प्रकारापेक्षा ५००० रुपये महाग आहे. क्रमवारीनुसार एक्सटी रिदम या प्रकाराला एक्सझेड प्लसच्या खालचे स्थान देण्यात आले आहे, जे ‘एक्सझेड’च्या तुलनेत ३८,००० रुपयांनी स्वस्त आहे.

Top 5 Automatic Cars : १० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणार ‘या’ टॉप पाच ऑटोमॅटिक कार; जाणून घ्या किंमत आणि मायलेज

फीचर्स

ज्याप्रमाणे रेग्युलर एक्सटी प्रकारापेक्षा एक्सटी रिदमसाठी ४५,००० हजार रुपये जास्त द्यावे लागतात, त्याप्रमाणे या नव्या प्रकारात अधिकचे आकर्षक फीचर्सदेखील आहेत. या प्रकारात तुम्हाला अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. यातील विशेष बाब म्हणजे इन्फोटेनमेंट सिस्टम व्हॉईस कमांड, फोटो आणि व्हिडीओ प्लेबॅकला सपोर्ट करते.

याशिवाय टाटा टियागो कारच्या या नव्या व्हेरिएंटमध्ये ‘डायनॅमिक’ मार्गदर्शक तत्त्वांसह स्टीयरिंग इनपुटला सपोर्ट करणारा रिव्हर्स पार्किंग कॅमेरादेखील देण्यात आला आहे. या कारमध्ये १.२ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे ८५ बीएचपीचे पॉवर आणि ११३ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत पाच-स्पीड मन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata tiago xt rhythm launched in india know price and features pns