कार क्षेत्रातील पेट्रोल आणि डिझेल कार सारख्या सीएनजी कारची वाढती मागणी लक्षात घेता, अनेक वाहन उत्पादकांनी त्यांच्या कारच्या सीएनजी वर्जन लाँच करण्यास सुरुवात केली आहे.
आज आम्ही टाटा मोटर्सच्या लोकप्रिय सेडान टिगोरच्या सीएनजी व्हेरिएंटबद्दल बोलत आहोत, ज्याची किंमत, फीचर्स आणि मायलेजमुळे तिला पसंती दिली जात आहे.
Tata Tigor CNG ची सुरुवातीची किंमत ७,८४,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी ऑन रोड असताना ८,८१,४८४ रुपयांपर्यंत जाते. तुम्ही ही टाटा टिगोर सीएनजी किटसह विकत घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला ही कार विकत घेण्याचा सोपा फायनान्स प्लान सांगू.
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही सेडान खरेदी केली तर बँक यासाठी ७,९३,४८४ रुपये कर्ज देईल. या कर्जानंतर तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून ८८,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर दरमहा १६,७८१ रुपये मासिक ईएमआय द्यावा लागेल.
आणखी वाचा : कमी बजेटमध्ये सनरूफ असलेली कार हवी असेल तर येथून मिळवा केवळ ३ लाखात Skoda Superb
टाटा टिगोर सीएनजीवर दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ६० महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. यावेळी दिलेल्या कर्जाच्या रकमेवर बँक ९.७ टक्के वार्षिक व्याजदर आकारेल.
फायनान्स प्लॅनद्वारे उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट, ईएमआय आणि व्याजदराची योजना जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला या सेडानचे इंजिन, फीचर्स आणि मायलेजचे डिटेल्स माहित असणे गरजेचे आहे.
Tata Tigor XZ CNG Engine and Transmission: TataTigor मध्ये ११९९ CC चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७२.४० पीएस पॉवर आणि ९५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
Tata Tigor XZ CNG mileage : मायलेजबद्दल, टाटा मोटर्सचा दावा आहे की ही सेडान पेट्रोलवर १९.२७ kmpl आणि CNG वर २६.४९ kmpl मायलेज देते.
आणखी वाचा : CNG कार घ्यायचीय? ७० ते ८० हजार खर्च करून घरी घेऊन जा Maruti Alto CNG
टाटा टिगोर XZ CNG फीचर्स : फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास टाटा मोटर्सने या सेडानमध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेच्या कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यांसारखी फीचर्स दिली आहेत.