देशात एसयूव्ही खरेदीकडे कार प्रेमींचा कल वाढताना दिसत आहे. आकाराने मोठी, अधिक पावर आणि अधिकच्या सिटिंग कॅपॅसिटीमुळे ग्राहक एसयूव्हींना जास्त पसंती देत आहेत. त्यांची विक्रीही वाढली आहेत. मात्र, सिडान कारची विक्री कमी झाली आहे. तरीही काही ग्राहक आहेत ज्यांना सिडान कार आवडते. कमी बजेटमध्येही तुम्हाला चांगली सिडान कार मिळू शकते. कमी बजेटमध्ये चांगल्या सिडान कारबद्दल जाणून घेऊया.
चांगले मायलेज आणि कमी किंमतीमुळे टाटाच्या कार भारतीय कार बाजारात धुमाकूळ घालत आहेत. टाटाच्या इव्ही कारना देखील ग्राहक पसंती देत आहेत. टाटाने ग्राहकांसाठी सिडान कार देखील उपलब्ध केली आहे. टाटा टिगोर असे या कारचे नाव आहे. या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत ६ लाखांपेक्षाही (एक्स शोरूम) कमी आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत ९ लाखांपर्यंत आहे. मारुती सुझुकी डिझायर, ह्युंडाई औरा आणि होंडा अमेझ या सारख्या वाहनांना ही कार आव्हान देते.
(२०२३ Kawasaki z900 भारतात लाँच, जुन्या मॉडेलपेक्षा इतक्या रुपयांनी महाग, जाणून घ्या फीचर)
इंजन आणि पॉवर
टाटा टिगोरमध्ये १.२ लिटरचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजन मिळते. हे इंजन ८६ पीएसची पावर आणि ११३ एनएमचा टॉर्क निर्माण करते. इंजनला ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीट एएमटीसोबत जोडण्यात आले आहे. कंपनी या कारच्या एक्सझेड आणि एक्सझेड प्लस व्हेरिएंटमध्ये सीएनजीचाही पर्याय देते. ज्यासोबत इंजन ७३ पीएस आणि ९५ एनएमचा आउटपूट देते.
फीचर
फीचरबद्दल बोलायचे झाल्यास, कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसह 7 इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याशिवाय ऑटो हेडलाइट्स, रेन सेन्सिंग वायपर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, किलेस एंट्री, ऑटो एसी देखील उपलब्ध आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, इबीडीसह एबीएस आणि मागील पार्किंग सेन्सरचा समावेश आहे.