भारतात इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. इलेक्ट्रिक कार्सचं सेगमेंट देशात खूप लोकप्रिय होत आहे. टाटा मोटर्स कंपनी या सेगमेंटवर वर्चस्व राखून आहे. कंपनी भारतात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स विकत आहे. टाटाच्या ज्या प्रीमियम ईव्ही हॅचबॅकची अनेक दिवसांपासून वाहनप्रेमी वाट पाहत होते ते आता टाटा आज बुधवारी २८ सप्टेंबर रोजी लाँच करून टाटा टिगॉर ईव्ही मॉडेलची बुकिंग सुरू करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच वेळी, कार लाँच होण्याआधी त्याचे अनेक फीचर्स देखील समोर आले आहेत. ही कार लाँच झाल्यानंतर आता टाटाच्या तीन ईव्ही बाजारात असतील. टिगॉर च्या आधी Nexon EV आणि Nexon EV Max ने देशाच्या EV बाजारपेठेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

या कारमध्ये काय खास असेल?

  • कंपनीने यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा दिली आहे.
  • कारमध्ये २६kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक असेल.
  • एका तासात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होईल.
  • पूर्ण चार्ज केल्यानंतर कार सुमारे ३०० किमी अंतर कापते.
  • यात Z कनेक्ट असेल जे स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.

आणखी वाचा : भारतीय बाजारपेठेत KTM ने लाँच केले ‘या’ दोन बाईकचे जीपी एडिशन; काय आहे खास जाणून घ्या…

इंटेरिअरही खास असेल

टिगॉर ईव्हीला काहीतरी खास बनवण्यासाठी कंपनीने त्याच्या इंटीरियरमध्येही मोठे बदल केले आहेत. त्याचा डॅशबोर्ड ड्युअल कलरमध्ये सादर केला जाईल. यासोबतच हरमन कंपनीची इन्फोटेनमेंट सिस्टीमही असेल. कार प्रीमियम लेदर सीट कव्हर्ससह येईल. त्याचबरोबर कंपनीने सीटच्या कुशनमध्येही काही बदल केले आहेत. मात्र, टिगोरच्या मूळ व्यासपीठाशी छेडछाड झालेली नाही.

टाटांचा बाजार

टिगोर लाँच केल्यामुळे टाटा ईव्ही मार्केटमध्ये आपले वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित करेल. Nexon EV च्या प्रचंड मागणीमुळे कंपनीने Tigor चे EV मॉडेल काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा कंपनीने या मॉडेलबद्दल माहिती दिली, तेव्हापासून लोक त्याच्या बुकिंगची वाट पाहत होते. आता कंपनीने नवरात्रात ही कार लॉन्च केली आहे. तथापि, कंपनीने यावर अद्याप कोणत्याही प्रकारची सूट किंवा ऑफरची माहिती दिलेली नाही.

किंमत 

त्याच वेळी, असे सांगितले जात आहे की ही पहिली प्रीमियम ईव्ही हॅचबॅक असेल आणि त्याची किंमत आत्तापर्यंत येणाऱ्या EV पेक्षा कमी असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटाने टिगॉर ईव्हीची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.